क्रिकेटमध्ये अनेकदा दोन सख्खे भाऊ आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तर अशा खेळाडूंची संख्या लक्षणीय असते. याच मालिकेत आता आणखी दोन भावांची नावे जोडले जाण्याची शक्यता आहे. हे दोन खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व त्याचा लहान भाऊ मोहम्मद कैफ हे आहेत. कैफने नुकत्याच आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवताना दिसतोय. यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
कैफचा हा व्हिडीओ होतं व्हायरल
मागील आठ वर्षांपासून भारतीय संघाचा सदस्य असलेला मोहम्मद शमी जसप्रीत बुमराहनंतर भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत वेगवान गोलंदाज आहे. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याचा लहान भाऊ मोहम्मद कैफ क्रिकेटचे मैदान गाजवू लागलाय. वेगवान गोलंदाज तसेच उपयुक्त फलंदाज असलेल्या कैफने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो फलंदाजांना आपल्या धारदार गोलंदाजीने बाद करताना दिसतोय.
https://www.instagram.com/p/CPAUfdZhWln/
कैफने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो बंगालच्या तेवीस वर्षाखालील संघासाठी खेळत असताना बडोद्याच्या फलंदाजांविरूद्ध गोलंदाजी करत आहे. या कामगिरीनंतर चाहत्यांनी त्याला ‘जूनियर शमी’ असे म्हणत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या २३ वर्षाच्या असलेल्या कैफने यावर्षीच्या सुरुवातीलाच बंगालसाठी विजय हजारे ट्रॉफीतून लिस्ट ए पदार्पण केले आहे. यामध्ये तो बळी मिळविण्यात मात्र अपयशी ठरला. त्याच्या पदार्पणावेळी मोठा भाऊ शमी याने ट्विट देखील केले होते.
पुढील मार्ग राहणार खडतर
कैफने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी त्याचा पुढील प्रवास आणखी खडतर राहणार आहे. नियमितपणे चांगली कामगिरी करून आधी रणजी ट्रॉफी तसेच आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये त्याला दमदार खेळ दाखवत भारतीय संघाचा दरवाजा ठोठवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
पृथ्वी शॉची फलंदाजी पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू झाला भलताच खुश; केली ‘ही’ मागणी
वाढदिवस विशेष: अवघ्या १० धावांवर १० विकेट्स, त्यातही हॅट्रिक घेणारे अवलिया; वाचा त्यांच्याविषयी






