पहिल्यावहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघांदरम्यान 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे. त्याआधी भारतीय संघ आपापसात सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्याचा तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर सगळे खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जात असतांना शार्दूल ठाकुरने जी कृती केली, त्याची अपेक्षा कोणी त्याच्याकडून केली नव्हती. ज्यावेळी सर्व खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जात होते त्यावेळी शार्दूल ठाकूर चक्क नेट्समध्ये सराव करण्यासाठी निघून गेला.
मागच्या काही काळापासून शार्दूल ठाकूर आपल्या आपल्या फलंदाजीवर अतिरिक्त मेहनत घेत आहे आणि गाबामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऐतिहासिक विजयादरम्यान शार्दूलचे महत्वाचे योगदान न विसारण्याजोगे आहे. शार्दूलला आपल्या फलंदाजी क्षमतेवर देखील खूप विश्वास आहे.
सराव सामन्यानंतर शार्दूलला नेट्सकडे जाताना रिषभ पंतने बघितले . ते पाहून पंत हैराण झाला . सोबतच प्रशिक्षक रवी शास्त्रीदेखील हे दृश्य बघत होते. त्यावेळी पंत शास्त्रीना म्हणाला, ‘शार्दूल, तो तर नेट्सच्या दिशेने निघून गेला आहे.’ हा व्हिडिओ बीसीसीआयने शेयर केला आहे.
शार्दूल आपल्या फलंदाजीप्रती इतके गंभीर असणे आश्चर्यजनक गोष्ट नक्कीच नाही, कारण त्याने जानेवारी महिन्यात सांगितले होते की, ‘मी एक अष्टपैलू गोलंदाज म्हणून ओळखले जाऊ शकतो. माझ्याजवळ फलंदाजीची क्षमता देखील असून मी भविष्यात जेव्हा कधी मला फलंदाजाची संधी मिळेल तेव्हा मी देखील एकूण धावसंख्येत माझ्या धावांचे योगदान देईल.’
The third day of intra-squad match simulation was about settling down & finding that rhythm. 👍 👍 #TeamIndia
Here's a brief recap 🎥 👇 pic.twitter.com/WByZoIxzT6
— BCCI (@BCCI) June 14, 2021
भारताच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने नाबाद अर्धशतक (76 चेंडूवर 54 धावा) केले आणि मोहम्मद सिराजने 22 धावा देऊन 2 बळी टिपले. याआधी रिषभ पंतने 94 चेंडूवर नाबाद 121 तर शुभमन गिलने 85 धावांची खेळी केली होती. पहिल्या दिवशी इशांत शर्मा 3 बळी घेण्यात यशस्वी झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये ‘या’ खेळाडूंना मिळू शकते स्थान
व्हिडिओ: फ्रंटफूट डिफेन्स ते स्क्वेअर कट! अंतिम सामन्यापूर्वी रहाणे तपासून पाहतोय भात्यातील अस्त्र
क्षणभर विश्रांती! श्रीलंका दौऱ्याआधी हार्दिक पंड्या घेतोय कौटुंबिक सहलीची मजा, पाहा फोटो