आजच्या पिढीला लिओनल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार ज्युनियर या खेळाडूंची नावे आणि त्यांच्या कामगिरी तोंडपाठ असतात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय आणि क्लब फुटबॉल कामगिरीने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. नुकतेच अर्जेंटिनाने तिसरा विश्वचषक जिंकला आणि मेस्सीच्या जगभरातील चाहत्यांनी आपापल्या परिने त्याचा आनंद व्यक्त केला. याआधी एक खेळाडू होता ज्याने त्याच्या विलक्षण खेळीने लोकांना वेडे केले होते. त्याला फुटबॉलचा जादुगरदेखील म्हटले जाते. तो होता पेले.
होताच कारण पेले (Pele) यांचे गुरूवारी (29 डिसेंबर, 2022) ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या 82व्या वर्षीअल्बर्ट आईन्स्टाईन हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला. पेले यांचे भारताशी नाते होते. त्यांनी भारतातील एका क्लबसोबत सामनाही खेळला असून त्यामध्ये एका खेळाडूने त्यांचे गोल अडवण्याची सुरेख कामगिरी केली.
1977चा तो काळ. खचाखच भरलेल्या कोलकाताच्या त्या इडन गार्डनवर 24 सप्टेंबरला भारताच्या फुटबॉल इतिहासातील एक महत्वाचा सामना खेळला गेला. तो सामना होता न्यूयॉर्क कॉसमॉस (New York Cosmos) विरुद्ध मोहन बागान (Mohun Bagan). या सामन्यात तीन वेळा विश्वचषक जिंकणारे पेले खेळले. या सामन्यात मोहन बागानचे वर्चस्व दिसले, कारण त्यांनी सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली होती, मात्र एका विवादित गोलमुळे सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.
Rest in peace, Pele.
We send our deepest condolences to his family and all those close to him following his sad passing.
We had the privilege of hosting the King of Football in 1977, at Eden Gardens — a memory we will always cherish. pic.twitter.com/pxNizvvXLb
— Mohun Bagan Super Giant (@mohunbagansg) December 29, 2022
त्यावेळचे मुख्य प्रशिक्षक पीके बॅनर्जी यांनी गौतम सरकार यांना पेलेला रोखण्याची जबाबदारी दिली. त्यांनी ती योग्यरित्या पार पाडली. या सामन्यानंतर पेलेंचा सन्मान केला गेला, तेथे त्यांना हिरेजडीत अंगठी दिली गेली, मात्र त्यांना भारताच्या खेळाडूंना भेटायचे होते. सर्वात पहिले गोलकीपर शिवाजी बॅनर्जी त्यांना भेटले. नंतर सहाव्या क्रमांकाच्या खेळाडूची घोषणा झाली, तेव्हा लोकांच्या घोळक्यात असलेले पेले पुढे आले आणि त्यांनी त्या खेळाडूची गळाभेट घेतली. तेव्हा ते म्हणाले, “तू जर्सी नंबर 14, ज्याने मला गोल करू दिला नाही.”
45 वर्षानंतर सरकार यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “सामन्यानंतर तेव्हा माझ्या शेजारी चुन्नी गोस्वामी उभे होते. ते मला म्हणाले गौतम आता फुटबॉल खेळणे सोड. हे कौतुक ऐकल्यावर आणखी काय बाकी होते. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होता.”
“या सामन्यासाठी आम्ही तीन आठवड्यापूर्वीच तयारी सुरू केली होती. पेले आमच्याविरुद्ध खेळणार यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी मी ईस्ट बंगालमधून मोहन बागानमध्ये आलो होतो. त्या एका सामन्यामुळे आमच्या क्लबचे नशीबच पालटले,” असेही सरकार पुढे म्हणाले.
Today, the world of football lost one of its greatest pioneers. But his memory will live forever in each and every one of us football lovers. Rest easy, King Pelé. pic.twitter.com/9DqHd0v3RO
— Mohun Bagan Super Giant (@mohunbagansg) December 30, 2022
या सामन्यानंतर मोहन बागानने आयएफए शील्डच्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगालला पराभूत केले. त्यानंतर रोवर्स कप आणि ड्युरंड कपही जिंकला. सात वर्षापूर्वी पेले पुन्हा कोलकाताला आले होते. तेव्हा ते दुर्गापूजेत सामीलही झाले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
आयपीएलच्या इतिहासात ‘या’ खेळाडूला मिळाली सर्वाधिक सॅलरी, धोनी दुसऱ्या स्थानावर