---Advertisement---

व्हिडिओ:…म्हणून सिडनीमध्ये द्रविडने १९वी धाव काढताच प्रेक्षकांनी वाजवल्या होत्या टाळ्या

On: रविवार, जानेवारी 5, 2020 8:48 PM
---Advertisement---

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात शुक्रवारी (3 जानेवारी) एक गमतीशीर घटना पहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या स्टिव्ह स्मिथने तब्बल 39 चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव घेतली.

त्याच्या खेळीची सुरुवात एवढी संथ गतीने झाली की त्याने त्याच्या खेळीतील पहिली धाव 45 मिनिटे आणि 39 चेंडू खेळल्यानंतर घेतली. त्यामुळे  पहिली धाव काढल्याने स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्या वाजवल्या. स्मिथनेही हात उंचावत त्यांच्या प्रोत्साहनाचा स्विकार केला.

या घटनेनंतर अनेकांना भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची आठवण झाली होती. झाले असे की 2008 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनीमध्येच झालेल्या कसोटी सामन्यात द्रविडने 19 वी धाव घेण्यासाठी 40 चेंडू खेळले होते. त्यावेळीही प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. तेव्हा द्रविडनेही बॅट उंचावत प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारले होते.

हा व्हिडिओ cricket.com.au ने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘स्टिव्ह स्मिथला सलग निर्धाव चेंडू खेळताना पाहून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर एक अशीच घटना घडली होत, त्याची आठवण झाली. तेव्हा राहुल द्रविडला 40 चेंडू खेळताना धाव घेता आली नव्हती.’

सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्यूशानेच्या (215) द्विशतकाच्या जोरावर सर्वबाद 454 धावा केल्या आहेत. तर न्यूझीलंडचा डाव 251 धावांवर संपुष्टात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---