माजी भारतीय क्रिकेटपटू व भारतीय संघाचा भावी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची क्रिकेटजगतात एक वेगळीच ओळख आहे. तो आपल्या संथ खेळीने व धैर्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजाची परीक्षा घेत असत. कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याच्या शैलीवरून त्याला क्रिकेटचाहते ‘द वॉल’, ‘भरोसेमंद’ अशा नावाने ओळखत असे. द्रविडच्या फलंदाजीची शैली पाहून सर्वजण त्यांना कसोटी क्रिकेटमधील उत्तम खेळाडू म्हटले जात असायचे. परंतु द्रविडने सर्वांना चुकीचे ठरून एकदिवसीय आणि टी२० सामन्यातही आपली छाप सोडली होती.
द्रविडने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीच्या शेवटच्या काळात इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यामध्ये असे काही केले होते, ज्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोनच बदलला होता. कसोटी क्रिकेटचा तज्ञ म्हणून ओळखला जाणारा द्रविड टी-20 सामन्यातही झळकला होता. तो त्याचा पहिला आणि शेवटचा टी-20 सामना ठरला. परंतु त्या सामन्यातील त्याच्या फटकेबाजीने सर्वांच्या मनात कायमची जागा मिळवली.
इंग्लंडच्या मॅन्चेस्टर स्टेडियममध्ये 2011 साली द्रविडने त्याचा पहिला आणि शेवटचा टी-20 सामना खेळला होता. भारताच्या डावातील 11 वे षटक चालू होता. इंग्लंडकडून समित पटेल गोलंदाजी करत होता. पटेलच्या पहिल्या चेंडूवर द्रविडने 1 धाव काढली आणि तो नॉन स्ट्राइकवर गेला. पुढील चेंडूवर अजिंक्य रहाणेनी देखील 1 धाव काढली, ज्यामुळे द्रविडला स्ट्राइक मिळाली. पुढे त्यांनी तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर जे काही झालं ते सर्वांच्या कल्पनेच्या बाहेरचे होते.
पटेलच्या पुढील उर्वरित तीन चेंडूंवर द्रविडने सलग तीन षटकार मारले. पटेलच्या चौथ्या चेंडूवर लाँग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर पहिला षटकार पाठवला. पाचव्या चेंडूला पुढे येऊन लाँग ऑनवरून मारले. सहाव्या व अंतिम चेंडूवर देखील द्रविडने मिडविकेटच्या वरून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवले.
शेवटी त्या सामन्यात द्रविड 21 चेंडूमध्ये 31 धावा करत बाद झाला. त्याच्या या खेळीमधील 3 गगनचुंबी षटकार आजही क्रिकेटचाहत्यांच्या आठवणीत आहेत. परंतु दुर्दैवाने भारताने तो सामना गमावला होता. या सामन्यात इंग्लंडने भारताला 6 विकेट्सने पराभूत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टंपिंग करताना झिम्बाब्वेच्या यष्टीरक्षकाकडून मोठी चूक, प्रेक्षकांवर पोट धरून हसण्याची वेळ
घरच्या मैदानावर एफसी गोवाची गाडी रूळावर आली; जमशेदपूर एफसीवर दणदणीत विजय