Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरच्या मैदानावर एफसी गोवाची गाडी रूळावर आली; जमशेदपूर एफसीवर दणदणीत विजय

घरच्या मैदानावर एफसी गोवाची गाडी रूळावर आली; जमशेदपूर एफसीवर दणदणीत विजय

November 3, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
fc goa

Photo Courtesy: Twitter/IndSuperLeague


गोवा, ३ नोव्हेंबर : हिरो इंडियन सुपर लीग ( आयएसएल) २०२२-२३ मध्ये घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळणाऱ्या एफसी गोवाने चाहत्यांना निराश नाही केले. आयएसएलच्या या पर्वात सलग दोन विजय मिळवून गोवाने दमदार सुरुवात केली होती, परंतु मागील लढतीत गतविजेत्या हैदराबाद एफसीने त्यांना पराभूत केले. मात्र, गोवाने गुरुवारी जमशेदपूर एफसीवर ३-० असा सहज विजय मिळवला. इकर गौरोत्क्सेना ( २ मि.) व नोआ सदौई ( १२ मि. ) यांनी पहिल्या १५ मिनिटांत मिळवून दिली आणि त्यात ब्रिसन फर्नांडेसने ९०+३ मिनिटात भर टाकली. गोवाने या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवताना गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

हिरो आयएसएलमधील १०० वा सामना संस्मरणीय करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या जमशेदपूर एफसीला दुसऱ्या मिनिटाला यजमान गोवाने झटका दिला. आयएसएल २०२२-२३ मध्ये गोवाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या मिनिटाला ब्रँडन फर्नांडेस शॉर्ट कॉर्नरवरून चेंडू पास केला आमि एडू बेडियाने तो सहा यार्डावर इकर गौरोत्क्सेनाकडे पाठवला. इकरने कोणतीच चूक न करताना संधीचं सोनं करताना गोवाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. एफसी गोवाकडून सातत्याने आक्रमण होत राहिले आणि ११व्या मिनिटाला पुन्हा एकदा ब्रँडनच्या पासवर नोओ सदौईने अप्रतिम गोल केला. त्याआधीच संघाचा बचावपटू मोहम्मद अर्नोटला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले होते, तरीही गोवाने त्यांचे मनोबल खचू दिले नाही.

१८व्या मिनिटाला जमशेदपूरने पलटवार करण्याची संधी मिळाली होती, परंतु वेलिंग्टन प्रिओरीने घाई केली आणि पेनल्टी बॉक्समध्ये सहकारी उपस्थित असतानाही स्वतः गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू गोल पोस्टवरून गेल्याने जमशेदपूरचे खेळाडू निराश दिसले. २१व्या मिनिटाला नोआ सदौई पुन्हा चेंडू घेऊन जमशेदपूरच्या पेनल्टी क्षेत्रात शिरला होता, परंतु ६ यार्डावर येताच त्याला बचावपटूने पाडले. सदौईने पेनल्टीची केलेली मागणी रेफरींनी फेटाळली. ३०व्या मिनिटाला पुन्हा एकदा सदौईला जमशेदपूरच्या बचावपटूने पाडले. पहिल्या हाफमधील २ मिनिटांच्या भरपाई वेळेतील अखेरच्या क्षणात सदौईने आणखी एक गोल केलाच होता, परंतु चेंडू पोस्टला लागून परतला. पहिल्या हाफमध्ये गोवाने वर्चस्व गाजवले. जमशेदपूरकडूनही दोन ऑन टार्गेट व ४ ऑफ टार्गेट प्रयत्न झाले, परंतु यशाने त्यांच्याकडे पाठ फिरवलेली दिसली.

मध्यंतरानंतर जमशेदपूरकडून आक्रमक खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु गोवाने दबदबा कायम राखत पाहुण्यांना बॅकफूटवरच ठेवले. ६०व्या मिनिटाला जमशेदपूरकडून डॅनिएल चूक्वूने सुरेख प्रयत्न केला, परंतु गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेमने बचाव केला. चूक्वूकडून सातत्याने गोवाच्या पेनल्टी क्षेत्रात आक्रमण होताना दिसले. जमशेदपूरच्या अन्य खेळाडूंनी आणखी जोर लावला असता तर त्यांच्याकडून गोल झाले असते. गोवाचा बचावात्मक खेळावर भर असलेला दिसला, परंतु ते संधी मिळेल तेव्हा गोल करण्याचा प्रयत्न करताना दिसले. सदौईचा खेळ संपूर्ण सामन्यात उल्लेखनीय झाला. भरपाईवेळेत सेव्हीयर गामाच्या पासवर ब्रिसन फर्नांडेसने गोल करून गोवाचा ३-० असा दणदणीत विजय पक्का केला.

निकाल : एफसी गोवा ३ ( इकर गौरोत्क्सेना २ मि., नोआ सदौई १२ मि., ब्रिसन फर्नांडेसने ९०+३ ) विजयी वि. जमशेदपूर एफसी ०.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपली टीम इंडियाची जर्सी ‘या’ खेळाडूंना देऊन अर्शदीप अन् चहल बनले हिरो, पाहा फोटो
भारताकडून टी20 विश्वचषकात विराटच करतोय सर्वाधिक धावा; गंभीर, रैना अन् रोहितही मागेच  


Next Post
Regis chakabva

स्टंपिंग करताना झिम्बाब्वेच्या यष्टीरक्षकाकडून मोठी चूक, प्रेक्षकांवर पोट धरून हसण्याची वेळ

Photo Courtesy: Screengrab/@ChetanJassi

जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता 'रुद्रावतार', मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार

Pro Kabaddi Captains

पुणेरी पलटणचा कर्णधार फझेल अत्राचलीने मानले चाहत्यांचे आभार! म्हणाला,' आम्हाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर...'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143