इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू झाला आहे. २०२२च्या आयपीएलमध्ये फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ आयपीएल ट्राॅफी जिंकण्याच्या दृष्टीने या हंगामात उतरला आहे. मागील वर्षी विराट कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याने एबी डिविलियर्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
विराट कोहली म्हणाला की, जर यावर्षी आरसीबी आयपीएल जिंकली, तर मी एबी डिविलियर्सच्या आठवणीत भावूक होईल. आरसीबीच्या आठवणींबाबत बोलताना भारताचा माजी कर्णधार म्हणाला, “जर आम्ही या हंगामाचे विजेतेपद जिंकले तर माझ्या डोक्यात पहिल्यांदा डिविलियर्सचा विचार येईल.” विराट कोहली (Virat Kohli) आणि डिविलियर्स (Ab De Villiers) ११ वर्ष आरसीबी या एका संघात खेळले आहेत. या दोन खेळाडूंनी फ्रॅंचायझीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करत संघाला कित्येकदा विजय मिळवून दिला आहे. तसेच, या दोघांनी अनेक विक्रमही केले आहेत, जे या हंगामात तोडणे कठीण आहे.
कोहली म्हणाला, “डिविलियर्स जरी घरून सामने पाहत असला, तरी त्याच्या संघाकडून अनेक अपेक्षा आहेत. तो एक चांगला व्यक्तिमत्व आहे. कारण, त्याने एवढ्या काळात चांगली कामगिरी केली आहे. आम्ही याची पुष्टी करू शकतो. तो अद्भूत आहे आणि मला नाही वाटत की, असा एखादी व्यक्ती सुद्धा असेल जी म्हणेल की, एबी डिविलियर्सने कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याच्या आयुष्यात योगदान दिले नाही.”
दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने मागील वर्षी आयपीएलच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डिविलियर्स २००८ आणि २०१०मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. नंतर २०११पासून २०२१ पर्यंत तो आरसीबी संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये १८४ सामन्यात ३९.७१ च्या सरासरीने आणि १५१.६९च्या स्ट्राईक रेटने ५,१६२ धावा केल्या आहेत.
विराट कोहली सध्या क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात कर्णधार नाही. त्याबरोबरच तो आता आरसीबी संघाचा भाग नाही. आरसीबी संघाला आयपीएल २०२२च्या पंजाबविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आता संघाचा दुसरा सामना ३० मार्चला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
“आमच्यासाठी तोच बेबी एबी”, केएल राहुलकडून २२ वर्षीय भारतीय युवा खेळाडूचे कौतुक
‘तेवतिया म्हणजे क्रांती, समोरच्या टीममध्ये अशांती’, मॅचविनरचे कौतुक करताना ‘हा’ दिग्गज बनला कवी
IPL 2022 । कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने जिंकला पहिलाच सामना, ‘या’ खेळाडूला दिले विजयाचे श्रेय