---Advertisement---

२०११च्या विश्वचषकादरम्यान आशिष नेहराला शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरने केली होती ‘ही’ मदत

---Advertisement---

मुंबई । 2011 विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना भारतीय चाहते कधीही विसरू शकत नाहीत. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला  पराभूत केले. मोठी धावसंख्या न उभारताही भारतीय संघाने या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले. त्याचबरोबर या सामन्यापूर्वी दोन पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदी यांनी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराला खास मदत केली होती. याचा खुलासा खुद्द आशीष नेहरा याने केला आहे.

आशिल्ड नेहरा विस्डेनच्या ग्रेटेस्ट रायवलरी पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 2-3 दिवसांपूर्वी कोणालाही माहित नव्हते की विश्वचषक उपांत्य सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. अचानकपणे सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल हे लोकांना समजले. चंदीगडमध्ये पंचतारांकित हॉटेल्स नव्हती. सामना पाहण्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडहून आलेल्या लोकांना पाहिले. ते सर्व सामने पाहण्यासाठी येत होते पण त्यांच्याकडे तिकीट नव्हते.”

तो म्हणाला की, “लोक विश्वचषकातील सामना पाहण्यासाठी बाहेर उभे होते. पण त्यांच्याकडे तिकीट नाही. मी भाग्यवान आहे की मला काही जादा तिकिटे मिळाली आणि पाकिस्तानकडून मला ही तिकीट मिळाले. मी शाहिद आफ्रिदीला सांगितले की मला दोन तिकिटे हवी आहेत, ते घेऊन देणं तुझी जबाबदारी आहे. यानंतर त्याच्याकडून मला दोन तिकिटे आणि शोएब अख्तरकडून दोन तिकिटे मिळाली. त्यावेळी माझ्याकडे सर्वाधिक तिकिटं होती.

2011च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात भारताने प्रथम खेळताना 260 धावा केल्या होत्या. लक्ष्य फार मोठे नव्हते परंतु पाकिस्तानी संघ दडपणाखाली आला आणि केवळ 231 धावा करू शकला. अशा प्रकारे भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षानंतर विश्वचषक जिंकला.

त्या विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धचा सामना नेहरासाठी कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना व्हायरस असूनही आयपीएल २०२० होणार सुपर-डूपर हिट; जाणून घ्या कारण…

‘भारताला विश्वचषक जिंकून देऊनच निवृत्त होणार’, पहा कोण म्हणतंय

-रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय

ट्रेंडिंग लेख-

या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल

-कर्टिस कॅम्फर – आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील सितारा

-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---