---Advertisement---

पत्रकाराच्या ‘त्या’ आर्टिकलमुळे सिद्धूंंवर झालेली टीका, पण वर्ल्डकपमध्ये वादळ आणत केली होती बोलती बंद

Navjot-Singh-Sidhu
---Advertisement---

नवज्योतसिंग सिद्धू. भारत देशातील एक नेहमी चर्चेत असणारे नाव. भारतीय क्रिकेट, राजकारण आणि टेलिव्हिजन अशा सर्व क्षेत्रांमध्ये योगदान दिलेले व्यक्तिमत्व. त्यांनी एका जुन्या प्रकरणात मागील वर्षी तुरुंगवास भोगला असला तरी, ऐनकेन कारणांनी त्यांची आठवण नेहमीच काढली जाते. आज आपण त्यांच्याच आयुष्यातील एका मोठ्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. काय होती ती घटना आणि कशाप्रकारे त्यांनी, आपल्या खेळाडू म्हणून क्षमतेचा दुसरा पैलू जगाला दाखवला.

सन 1980 पासून भारतीय क्रिकेट वर्तुळात नवज्योतसिंग सिद्धू हे नाव झळकू लागले. पंजाबसाठी रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केलेली. राजकारणाचा वारसा असलेल्या घरातून त्यांनी क्रिकेटच्या पीचवर दमदार एन्ट्री केलेली. 1983 मध्ये भारताकडून खेळण्याची त्यांना संधी मिळाली. त्यावेळी सर्वात खूंखार मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्ध त्यांनी पदार्पण केलेले. मात्र, वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ते अत्यंत विचित्र पद्धतीने आऊट झाले. ओपनर म्हणून खेळताना नव्या बॉलवर त्यांची धांदल उडाली. सिद्धूंच्या खराब कामगिरीनंतर त्यावेळी इंडियन एक्सप्रेससाठी काम करणारे पत्रकार राजन बाला यांनी एक आर्टिकल लिहिले. त्याला हेडिंग दिले, “सिद्धू द स्ट्रोकलेस वंडर”

त्यावेळी संपूर्ण क्रिकेटजगतात हे आर्टिकल चांगलेच प्रसिद्ध झाले होते. सिद्धूंवर मोठ्या प्रमाणात टीका झालेली. त्याचवेळी सिद्धू यांना पाठिंबा देणारेही काही पत्रकार आणि खेळाडू होते. जसे जगभरात हे आर्टिकल पोहचले, तसेच ते सिद्धू यांच्या कुटुंबापर्यंतही जाण्यास वेळ लागला नाही. स्वतः सिद्धू आणि कुटुंबाला अतिव दुःख झाले. दरम्यानच्या काळात सिद्धू यांचे वडील सरदार भागवत सिंग यांनाही देवाज्ञा झाली. ज्या वडिलांनी आपल्याला क्रिकेटर म्हणून घडवण्यासाठी इतके कष्ट घेतले, त्या वडिलांच्या हयातीत आपण एकही चांगली इनिंग खेळू शकलो नाही, यामुळे सिद्धू निराशेच्या गर्तेत गेले. यातून त्यांना बाहेर येण्यासाठी बराच कालावधी लागला.

सिद्धू यांनी आता काहीही करून स्वतःला सिद्ध केलंच पाहिजे असा पण केला. त्यांनी डोळ्यासमोर टार्गेट ठेवलं तीन वर्षांनी येणाऱ्या 1987 वर्ल्डकपचे. काहीही करून आपल्याला या वर्ल्डकपमध्ये खेळायचेय असा चंग त्यांनी बांधला. कठोर मेहनत घेतली. बॅक टू बेसिक्स हा मंत्र अवलंबला. रणजी खेळायला गेले. पुन्हा एकदा पहिल्यासारखा रन्सचा डोंगर उभारला. अखेर जे लक्ष ठेवलेलं ते लक्ष त्यांनी साध्य करून दाखवलेच. 1987 वर्ल्डकपच्या 14 सदस्यीय स्कॉडमध्ये त्यांनी जागा बनवलीच. योगायोगाने हा वर्ल्डकप भारतातच होणार असल्याने टॉप परफॉर्मन्स करायचं सिद्धू यांनी मनाशी पक्क केलं.

टीम इंडियात सुनील गावसकर आणि कृष्णामाचारी श्रीकांत यांच्यासारखे दिग्गज ओपनर असल्याने सिद्धू यांना ओपनिंगला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच मॅचला 73 रन्स चोपत शानदार वर्ल्डकप डेब्यू केला. न्यूझीलंडविरुद्ध सिद्धूंनी 71 बॉलमध्ये 75 रन्सची दणकेबाज इनिंग खेळली. चार फोर आणि चार सिक्सचा त्यात समावेश होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा 51 आणि झिम्बाब्वेविरूद्ध 55 रन्स ठोकत, सलग चार फिफ्टीज मारून त्यांनी सर्व टीकाकारांची तोंड बंद केली. टीम इंडिया सेमी फायनलपर्यंत पोहोचली. या प्रवासात सिद्धू भारतासाठी ट्रंपकार्ड सिद्ध झाले. 7 मॅचच्या 5 इनिंग्समध्ये 276 रन्स त्यांच्या बॅटमधून आलेले. त्यातही होते 10 सिक्स. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक. टेस्ट स्पेशालिस्ट ते वनडेचा परफेक्ट बॅटर अशी त्यांनी ओळख बनवली.

त्या वर्ल्डकपनंतर पाकिस्तान टीम इंडियाविरुद्ध खेळणार होती. त्या सिरीजवर सर्वांचे लक्ष होते. जगभरातील पत्रकार ती सिरीज कव्हर करायला आलेले. त्यात पुन्हा एकदा समाविष्ट होते राजन बाला. त्यांनी पुन्हा एकदा सिद्धूंसाठी एक आर्टिकल लिहिले. यावेळी रवी शास्त्री ते आर्टिकल घेऊन सिद्धूकडे पोहोचले. त्या आर्टिकलचे हेडिंग होते. ‘फ्रॉम अ स्ट्रोकलेस वंडर टू‌ पाम ग्रुव्ह हिटर’ त्यावर सिद्धूंची प्रतिक्रिया होती‌, फक्त एक स्माईल. त्याच सिरीजमध्ये सिद्धू यांनी सर्वात लांब सिक्स मारला आणि आपली आणखी एक ओळख निर्माण केली ‘सिक्सर सिद्धू’.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्रविडपूर्वी ‘हे’ दिग्गज होते टीम इंडियाची पहिली वॉल, ज्यांना म्हटलं जायचं गावसकरांचा ‘राईट हँड’
भारताच्या गोलंदाजीला सोन्याचे दिवस आणू शकणारे 5 धुरंधर, 2022मध्ये केलंय संघात पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---