इंग्लड संघातील मोईन अली हा एक चांगला क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या तो वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. उपयुक्त डावखुरा फलंदाज आणि ऑफस्पिनर गोलंदाज असेला मोईन अली सध्या मूल बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केलेल्या एका विवादात्मक ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. नसरीन यांनी ते ट्विट नंतर डिलीट केले होते. पण तोपर्यंत हे ट्वीट वादाच्या भोवऱ्यात अडकले.
तस्लीमा यांनी लिहिले होते की, “मोईन अली हा क्रिकेटपटू झाला नसता तर तो सिरियाला जाऊन इसिसचा संघटनेचा भाग झाला असता.” इसिस ही जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना आहे. या ट्विटमुळे त्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या. यामध्ये मोईनचा सहकारी क्रिकेटपटू जोफ्रा आर्चरने देखील त्यांच्यावर असे वाद निर्माण करणारे ट्विट केल्याबद्दल निशाणा साधला होता.
तर आज आपण या दिग्गज क्रिकेटपटूच्या बालपणी एकदा त्याला एका गाडीने ठोकरण्याचा प्रयत्न केलेल्या घटनेबाबत जाणून घेऊ.
मोईन अलीने इंग्लंडच्या गार्डियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो 13 वर्षाचा असताना एका कारने त्याला चिरडून जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणाला होता, “तो एक आशियाई व्यक्ती दिसत होता. पण तो नक्षलवादी असू शकत नाही. पण त्याने हे का केले, हे मला माहिती नाही.”
मोईनचे वडील मुनीर, हे एक पाकिस्तानी तर आई ब्रिटिश आहे. त्याच्या वडीलांनी क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, “तो जवळपास 13 वर्षाचा असावा. तो शाळेतून घरी येत होता. तेवढ्यात एक कार भरदाव वेगाने त्याच्या दिशेने आली. परंतु, त्याचा अंदाज चुकला आणि तो वाचला परंतु कार पुढे जाऊन थांबली. त्यामध्यील ड्रायव्हर हा एक आशियाई माणूस दिसत होता.”
तसेच त्यांनी सांगितले की, त्याने त्या व्यक्तीला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. किंवा त्यानंतरही पुन्हा कधीही पाहिले नाही. त्याने गाडीची काच उघडली आणि शिवीगाळ करत गाडी उलट दिशेने आणली आणि त्याने मोईनला धडक दिली. त्यामुळे मोईन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला तर कार खूप वेगाने असल्याने फुटपाथच्या काठावर जाऊन आदळली. त्या कारचा वेग इतका होता की कार पलटी झाली. एका दुकानदाराने मला फोन करून बोलावले. जेव्हा मी पळत तिथे पोहोचलो, तेव्हा मला दिसले की मोईन रडत आहे आणि त्याच्या पायातून बरेचसे रक्तही येत आहे.”
प्रथम मोईनला वाटले की हा एक अपघात आहे. त्याने ड्रायव्हरला पाहण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण लवकरच त्याला सत्य कळाले.हा अपघात नसून मारण्याच्या प्रयत्न होता.
तसेच मुनीर यांनी सांगितले की “त्या व्यक्तीने काहीतरी सांगितले आणि तो म्हणाला की, ‘तो (मोईन)भाग्यवान आहेस की मी त्याला मारले नाही.’ हे ऐकून,मला समजले की हे चुकुन झाले नाही तर जाणीवपूर्वक केले गेले आहे. त्यामुळे मी त्याच्या जबड्यावरती आणि नाकावरती जोरदार मारले. मला इतका राग या अगोदर कधीच आला नव्हता.”
त्यावेळी त्या ठिकाणी लोक जमले आणि त्यांनी ही भांडणं सोडवली. यानंतर पोलिसांनी चौकशीही केली. मात्र, घटनेबाबत त्यांच्या कुटुंबामध्ये पुन्हा कोणतीही चर्चा झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ हंगामत कोहलीचे दिसणार ‘विराट’ रुप? ‘हे’ ३ मोठे विक्रम करण्यास सज्ज
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेली सीएसके पटकावणार चौथे जेतेपद? पाहा ‘थाला’च्या संघाचे पूर्ण वेळापत्रक
ग्रँड वेलकम! एमएस धोनीने केले पुजारासह ७ नव्या खेळाडूंचे चेन्नई संघात खास स्वागत, पाहा फोटो