मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने एक धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. सौरव गांगुलीने बालपणी एका भुताला पाहिले असल्याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे हे भूत त्याने सुमसाम जागेत किंवा जंगलांमध्ये नव्हे, तर आपल्या घरामध्ये पाहिले होते.
गांगुली एका वेबसाइटवर बोलताना म्हणाला की, “मी तेव्हा 12-13 वर्षांचा होतो. तेव्हा मी माझ्या घरामध्ये भूत पाहिले होते. आमच्या घरात एक मुलगा काम करत होता. आमचे संपूर्ण कुटुंब दुसऱ्या मजल्यावर होते. माझ्या कुटुंबाने त्या मुलाला चहा बनवण्यास सांग असा निरोप माझ्याकडे दिला होता. तो निरोप देण्यासाठी मी स्वयंपाक घरात गेलो. मात्र, तिथं कुणीही नव्हतं. त्यानंतर माझ्या परिवाराने मला घराच्या छतावर पाहण्यास सांगितले. मी तिथंही गेलो. मी जेव्हा छतावर पोचलो, तेव्हा तिथेही कुणी नव्हतं.”
तो म्हणाला, “आमची इमारत सहा मजल्याची होती. तो मुलगा छतावरच्या बाऊंड्री वॉलवर धावत होता. जर त्याचा तोल गेला असता, तर तो खाली पडून मेला असता. मी त्याला खाली उतरण्यास सांगितले, मात्र याचा कोणताच फायदा झाला नाही. त्यानंतर मी माझ्या काकांकडे गेलो आणि तो मुलगा वेडा झाला असल्याचे सांगितले.”
“माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य छताच्या दिशेने धावत गेले. मात्र त्यावेळी तिथे कुणीच नव्हते. तो मुलगा बाजूला असलेल्या झाडावर चढून बसला होता. लगेच आम्ही फायर ब्रिग्रेडवाल्यांना बोलवून घेतले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता तो मुलगा पुन्हा आमच्या घरी अाला. आम्ही त्याला घाबरून पळू लागलो. त्यानंतर त्या मुलाने सांगितले की, त्याच्या आईचा आत्मा त्याच्या शरीरात शिरतो,” असे सौरव गांगुलीने सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्लंडचा कर्णधार जो रुटला कन्यारत्न; इंस्टाग्रामवर फोटो केला शेअर
-अतिशय देखण्या बायका असलेले ५ फ्लॉप भारतीय क्रिकेटर्स
-विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तान का खातो सपाटून मार? जाणून घ्या कारणं