दुबई येथील आयसीसी अकादमी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यादरम्यान एका घटनेमुळे रोहित शर्माची खूप मोठी फजिती झाली. रोहित शर्माला इतर कोणीही नाही, तर त्याचा सहकारी खेळाडू विराट कोहलीनेच फजित केले.
झाले असे रोहित शर्मा स्वतः नाणेफेक करण्यासाठी मैदानावर आला. नाणेफेक झाल्यानंतर त्याने सांगितले, की विराट कोहलीला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा म्हणाला की, विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे या सामन्यात खेळणार नाहीत, पण काही वेळानेच कोहली क्षेत्ररक्षणासाठी मैदानात पोहोचला.
विराट कोहलीने केवळ मैदानावर आला नाही, तर त्याने २ षटके गोलंदाजी देखील केली. या दरम्यान त्याने १२ धावा दिल्या, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. यामुळे रोहित शर्माला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.
Rohit on hearing that Virat is ready to bowl pic.twitter.com/remeVUyVH8
— Harisankar (@harish_staycalm) October 20, 2021
So Rohit Sharma was only the 'toss captain'. ???? pic.twitter.com/jukf0axBgx
— Harsh (@100off52) October 20, 2021
Rohit at toss said virat is rested and now virat is bowling, fielding and even captaining the side. ????#WarmUpMatches #IndvAus pic.twitter.com/R9Bc8F3RGP
— Aman (@CaptainKohli___) October 20, 2021
Rohit captaining , virat bowling ???????? #RohitSharma #ViratKohli pic.twitter.com/7tiFNhB3Bm
— Bhargav (@Bhargavanenenu) October 20, 2021
Doesn't matter who is Toss Captain
He will be always Captain #ViratKohli ❤Toss Captain Rohit Sharma ,On The Field As always Virat kohli The Captain ❤ #IndvAus pic.twitter.com/whil3pBIhS
— Shamsi ( MSH) (@ShamsiHaidri) October 20, 2021
Rohit is captain for today's match , but still Virat is setting field #IndvAus pic.twitter.com/HvpJiAwJzJ
— ಭವಿತ್ ಶೆಟ್ಟಿ | Bhavith Shetty (@BhavithShetty4) October 20, 2021
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ गडी गमावून १५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथने ४८ चेंडूत सात चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. स्मिथ व्यतिरिक्त मार्कस स्टोइनिसने २५ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४१ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलने २८ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन, तर भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने १७.५ षटकांत १५३ धावा करत सामना सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून एश्टन अगरने एकमेव विकेट घेतली. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.
राहुलने ३१ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. रोहितने ४१ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी खेळली. यानंतर सूर्यकुमार यादवने २७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ३८ धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने आठ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने नाबाद १४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
गोल्डन बॉय इज बॅक! नीरज चोप्रा दीर्घ विश्रांतीनंतर परतला मैदानावर, पाहा फोटो
‘आर्चर, स्टोक्स टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नसणे लाजिरवाणे’, इंग्लंडच्या फलंदाजाचे मोठे वक्तव्य
टी२० विश्वचषकातील आतापर्यंतचे शतकवीर; केवळ एका भारतीयाचा समावेश






