सुनील गावस्कर यांच्यानंतर वीरेंद्र सेहवाग हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर मानला जातो. सेहवागचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने 104 कसोटी सामन्यांमध्ये 8586 धावा केल्या. सलामीवीर म्हणून त्याच्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 99 सामन्यात 9207 धावा केल्या. सुरुवातीचे काही सामने वगळता सेहवाग कसोटीत अनेक वेळा सलामी दिली आहे. त्याचे सलामीवीर होणे सोपे नव्हते. त्याला माजी कर्णधार सौरव गांगुलीने ही जबाबदारी दिली होती.
सेहवागने सौरव गांगुलीच्या बंगाली शो ‘दादागिरी’मध्ये सलामीवीर बनण्याची कहाणी सांगितली होती. यावेळी शोमध्ये झहीर खान, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग आणि रविचंद्रन अश्विन देखील उपस्थित होते. सेहवागने सांगितले की, जेव्हा त्याला इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामन्यांमध्ये ओपनिंग करण्यास सांगितले होते तेव्हा तो थोडा संकोचला होता. त्यावेळी मधल्या फळीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे दिग्गज खेळाडू होते.
सेहवागला भिती होती की जर सलामीमध्ये अपयशी ठरलो तर मला पुन्हा मधल्या फळीत स्थान मिळणे अवघड होऊ शकते. यानंतर त्याने गांगुलीला कागदावर लिहायला लावले की ओपनिंगमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याला मधल्या फळीत संधी मिळेल. मात्र, अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही की सेहवागला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागली.
सेहवागने पुढे सांगितले की, सौरव गांगुलीने त्याला ओपनिंगसाठी अनेक तर्क दिले होते. सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते आणि श्रीलंकेत सलामी करतानाही धावा केल्या होत्या, असे गांगुलीने म्हटले होते. मधल्या फळीत आधीच अनेक दिग्गज खेळाडू असून सेहवागला सलामीला संधी मिळायला हवी, असेही गांगुली म्हणाला.
वीरेंद्र सेहवागने असेही सांगितले की व्हीव्हीएस लक्ष्मणने त्याला सलामी न करण्याचा सल्ला दिला होता. लक्ष्मणला विश्वास होता की जर सेहवाग सलामीला अपयशी ठरला तर त्याची कारकीर्द संपुष्टात येईल. पण, सेहवागने गांगुलीच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवला आणि सलामीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या कारकिर्दीसाठी योग्य ठरला आणि तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्फोटक सलामीवीर ठरला.
महत्तवाच्या बातम्या-
अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणाची संधी! फक्त करावं लागेल हे काम
रिकी पाँटिंगच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ! म्हणाले.., हा युवा खेळाडू होणार जागितक क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीचा सुवर्ण इतिहास, जाणून घ्या आतापर्यंत किती पदकं जिंकली