भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) बऱ्याच दिवसापासून भारतीय क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान (ICC ODI World Cup) त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडमध्ये त्याच्या घोट्याच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले नाही,
सध्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी शमी जोरदार सराव करत आहे. मात्र तो भारतीय संघात कधी परतणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शमीनं सुमारे तीन आठवड्यांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. खरं तर, त्यानं त्याच्या एका पोस्टला कॅप्शन लिहिले होते, “हातात चेंडू आणि हृदयात जोश, खेळ बदलण्यासाठी तयार आहे.” पण दुलीप करंडक स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या चार संघांपैकी एकाही संघात त्याचे नाव समाविष्ट न झाल्याने शमीच्या पुनरागमनावर सर्वात मोठे प्रश्नचिन्ह पुन्हा उभे राहिले आहेत.
काही दिवसापूर्वी मोहम्मद शमी (Mohammed Shami) म्हणाला होता की, “मी खूप मेहनत करत आहे, पण आशा आहे की तुम्ही मला पुन्हा भारताची जर्सी परिधान करण्यापूर्वी बंगालच्या रंगात पहाल. मी बंगालसाठी खूप मेहनत करत आहे. दोन-तीन सामने खेळणार आहे आणि त्यासाठी पूर्ण तयारीने येईन.”
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकन क्रिकेटर अडकला डोपिंगमध्ये, बोर्डाने अनिश्चित काळासाठी केले निलंबित
दिल्ली प्रीमियर लीगला उद्यापासून (17 ऑगस्ट) शुभारंभ! कधी आणि कुठे पाहायचे सामने?
“असं वाटलं होतं ती मरेल” विनेश फोगटच्या प्रशिक्षकाचे खळबळजनक वक्तव्य!