पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरुवात झाली. खेळाच्या या महाकुंभात भारताने एक दिवस आधी 25 जुलै रोजी आपल्या मोहिमेला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत भारताच्या पदरात दोन पदके आली आहेत, पण या सगळ्यामध्ये चाहते भालाफेकपटू नीरज चोप्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात गेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा यावेळी ॲक्शनमध्ये कधी दिसणार? या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचे वेळापत्रक काय आहे?
नीरज चोप्रा 06 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ॲक्शनमध्ये पहायला मिळणार आहे. नीरज चाैप्रा 06 ऑगस्ट रोजी भालाफेक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व करणार आहे. भालाफेकीच्या गट-अ ची पात्रता फेरी दुपारी 1:50 वाजता सुरू होईल, तर गट-ब ची पात्रता फेरी दुपारी 3:20 वाजता सुरू होईल.
जर नीरज चोप्राने पात्रता फेरी यशस्वी रित्या पार केल्यास, तो 08 ऑगस्ट रोजी फायनलसाठी मैदानात उतरेल. भारत पुन्हा एकदा नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा करत आहे.
नीरज चोप्राची ॲक्शन लाईव्ह कुठे पाहू शकता?
स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून ऑलिम्पिक 2024 चे भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. भारतातील क्रीडा महाकुंभाचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमाद्वारे केले जात आहे. तुम्ही जियो सिनेमावर सर्व खेळ मोफत पाहू शकता. स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमावरही नीरज चोप्राची ॲक्शन दिसणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले
यापूर्वी नीरज चोप्राने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नीरजने 87.58 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. आता पुन्हा एकदा नीरजकडून इतिहासाची पुनरावृत्ती करून भारताच्या किटीमध्ये सुवर्णपदकांची भर पडेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा-
पीव्ही सिंधूची पदकाच्या दिशेनं वाटचाल, राउंड ऑफ 16 मध्ये धडाक्यात एंट्री
7 महिन्यांची गर्भवती, तरीही ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला; या ॲथलीटच्या खुलाशाने जग हादरले
परवानगीशिवाय फोटो वापरला, मनू भाकर या दोन नामंकित ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई करणार