टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्येच आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया तेथेच अडकली आहे. पण आता बीसीसीआयनं यावर उपाय शोधला आहे. रोहित ब्रिगेड भारतात कधी परतणार यावर एक मोठी अपडेट आली आहे.
टीम इंडिया 3 जुलैला संध्याकाळपर्यंत दिल्लीत पोहचेल. वृत्तानुसार, बीसीसीआयनं टीम इंडियासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. खेळाडूंसह सर्व सदस्य बार्बाडोसच्या वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता भारतासाठी रवाना होतील. टीम इंडिया 3 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:45 वाजता दिल्लीला पोहोचेल असं सांगण्यात येत आहे.
वादळामुळे बार्बाडोसचं विमानतळ बंद करण्यात आलं असून तेथील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अजूनही तिथेच अडकले आहेत. भारतीय संघ सोमवारी मायदेशी रवाना होणार, असं नियोजन होतं. मात्र, बार्बाडोसमध्ये आलेल्या वादळामुळे हे शक्य झालं नाही.
वृत्तानुसार, वादळ खूप वेगानं बार्बाडोसला धडक मारणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडूंना आपापल्या हॉटेलमध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. बीसीसीआयनं सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांना विशेष चार्टर्ड विमानानं परत आणण्याची योजना आखली आहे. भारतात परतल्यानंतर टीम इंडियाचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात येईल.
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली. बीसीसीआयनं संपूर्ण टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला 5 कोटी, 15 सदस्यांचा सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 1 कोटी, तर निवड समितीमधील 5 सदस्यांना 50 लाख रुपये मिळणार आहेत. भारतीय संघात एकूण 15 खेळाडू, 15 सदस्यांचा सपोर्ट स्टाफ आणि 5 निवड समिती सदस्य आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त ‘त्या’ खेळाडूने कॉल केला नसता तर द्रविड कोच राहिला नसता…
टीम इंडियाच्या 15 जणांच्या सपोर्ट स्टाफमध्ये नक्की आहे तरी कोण-कोण? पाहा संपुर्ण यादी…
टीम इंडियाला मिळणाऱ्या 125 कोटींची अशी होणार विभागणी, रोहितला 5 कोटी तर विराटला…