पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पदक जिंकता-जिंकता राहिली. तिनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक मारली होती, मात्र अवघ्या 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं. अशाप्रकारे विनेश फोगटचं पदक अगदी थोडक्यात हुकलं.
यानंतर विनेश फोगटनं तिला किमान रौप्य पदक मिळावं यासाठी CAS न्यायालयात अपील दाखल केलं आहे. त्याचा निकाल येणं बाकी आहे. दरम्यान, विनेश फोगट पॅरिसहून भारतात कधी परतेल, याबाबत अपडेट समोर आलं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये बजरंग पुनियानं, विनेश फोगट भारतात कधी परतणार? हे सांगितलं. तसेच त्यानं तिचं पूर्ण वेळापत्रकही शेअर केलं आहे.
विनेश फोगट 17 ऑगस्टला भारतात येत आहे. त्या आधी तिच्या पदकाबाबतचा निर्णय 16 ऑगस्ट रोजी क्रीडा लवादाच्या न्यायालयात होणार आहे. क्रीडा लवादाच्या न्यायालयाचा निर्णय विनेश फोगटच्या बाजूने आला तर या तिला रौप्य पदक मिळेल. न्यायालयाचा निर्णय विनेश फोगटच्या बाजूनं येईल आणि देशाची मुलगी पदक मिळवून देईल, अशी आशा भारतीयांना आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या पोस्टनुसार, विनेश फोगट 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. यानंतर द्वारका द्रुतगती मार्गावरून ती धनकोट, बढसा एम्स, बादली, झज्जर बाय-पास, जहाजगढ, छुछकवास, इमलोटा, मोखाला, लोहरवाडा, समसपुर, दादरी बाय-पास, लोहारू चौक, हाथी पार्क दादरी, तिकोना पार्क, घसौला, मन्दौली, मन्दौला, आदमपुर ढाढी वरून बलाली येथे जाईल.
सभी को नमस्कार 🙏🏼
विनेश फोगाट सुबह 10:00 am 17 August को एयरपोर्ट
पर पहुँच जायेगी ! pic.twitter.com/xxHYCTJ1GK— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) August 14, 2024
हेही वाचा –
भारतीय संघात संधी मिळेना, स्टार फिरकीपटूनं धरली इंग्लंडची वाट
हार्दिक पांड्या पुन्हा डेट करतोय? कोण आहे सोशल मीडिया स्टार जास्मिन वालिया?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका कोणता संघ जिंकेल? भारताच्या दिग्गजानी केली भविष्यवाणी