---Advertisement---

“जेव्हा लिलावावेळी झहीर खानने माझे नाव घेतले, तेव्हा डोळ्यात अश्रू तरळले”, मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू झाला भावूक

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 9:40 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १४ व्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यामध्ये पहिल्या सामन्यात पराभव तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळाला आहे. सर्वात जास्त वेळा विक्रमी आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई संघाने यावर्षी युद्धवीर सिंग चारक नावाच्या नव्या दमाच्या खेळाडूचा संघात समावेश केला आहे. या नव्या दमाच्या खेळाडूला अजून खेळायची संधी मिळालेली नाही पण लवकरच ती मिळेल, अशी अपेक्षा त्याला आहे.

जेव्हा युद्धवीर सिंग मुंबई संघासोबत जोडला गेला तेव्हा त्याच्यासाठी तो भावनिक क्षण होता, असे त्याने मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

युद्धवीर सिंग त्याच्या निवडीबद्दल बोलताना म्हणाला की,”मुंबई संघात माझी निवड होणे हे माझ्यासाठी खूप आश्चर्यजनक आहे. मुंबई संघात निवड होणे माझ्यासाठी आणि सोबतच मी ज्या राज्यातून येतो त्या जम्मू-काश्मीर राज्यासाठी खूप खास होती. मी आयपीएल मधील सामने खेळून माझ्या राज्याचे नाव मोठे करील आणि सोबतच मला माझ्याकडून पण खूप आशा आहेत.”

युद्धवीरचा जन्म जम्मूमध्ये झाला आहे. तसेच तो देशांतर्गत क्रिकेट हैदराबादकडून खेळतो. त्याला मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल लिलावात त्याच्या मुळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयात खरेदी केले होते. त्याने सांगितले की २०२१ आयपीएलचा लिलाव झाला तेव्हा मुंबई इंडियन्स संघाचे संचालक जहीर खान यांनी जेव्हा त्याचे नाव घेतले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते.

तो म्हणाला की, “मला माहित होते की जर माझे नाव पुकारले गेले तर ते शेवटचे असेल आणि नाही तर ठीक आहे. मी आणि माझे कुटुंब टीव्ही पाहत होतो. लिलावाच्या वेळी झॅक सरने (झहीर खान) माझे नाव घेतले तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.”

युद्धवीरने आत्तापर्यंत २ प्रथम श्रेणी सामने खेळले असून २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ३१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ६ टी२० सामने खेळले असून त्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘सिक्सर किंग’ रोहित! आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी

विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधाराचे कुटुंबीय कोरोनाबाधित, रेमडीसिवरसाठी मागितली मदत

सामना गमावला तरीही ‘पावर हिटर’ शाहरुखने जिंकले प्रिती झिंटाचे मन, ट्विट करत म्हणाली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---