भारतीय पुरूष क्रिकेट संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला. पर्थ येथे पोहोचल्यावर भारताने सरावाला सुरूवात देखील केली आहे, मात्र भारत 14 मुख्य सदस्यासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. त्यावेळी संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघासोबत नव्हता. तो दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे, तर त्याची पत्नी संजना गणेशन ऑस्ट्रेलियाला पोहचला आहे, ती या आयसीसी स्पर्धेचे समालोचन करणार आहे.
संजना गणेशन (Sanjana Ganesan) हीने ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला तिने मी अशा ठिकाणी जात आहे जी लवकरच माझी आवडती होणार आहे. तिच्या या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे., मात्र काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे.
एका चाहत्याने लिहिले की ‘जसप्रीत बुमराह वर्ल्डकपसाठी जात नाही, मात्र संजना जात आहे.’ तसेच एका चाहत्याने लिहिले, ‘भाभीजी भाईसाहब कहा है?’ तर काहींनी लिहिले की ‘बुमराह कुठे गुमराह झाला.’ एका युजरने ट्वीटमध्ये लिहिले की, भैया भी आते तो अच्छा लगता’
@Jaspritbumrah93 bhiya bhi aate toh aur acha lagta ????
— Child of god (@24Abhishek10) October 7, 2022
संजनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ती नेहमी आयसीसीसाठी मुलाखती घेत असतेआणि मोठ्या स्पर्धांमध्ये समालोचकाची भुमिकाही चांगली पार पाडते. यामुळेच ती ऑस्ट्रेलियाला गेली आहे.
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तसेच त्याला आशिया चषक 2022 स्पर्धेसही दुखापतीमुळे मुकावे लागले होते. त्याने दुखापचीनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळले होते, मात्र त्याला परत दुखापत झाली आणि तो महत्वाच्या स्पर्धेस मुकला.
सध्यातरी भारतीय क्रिकेट बोर्डने बुमराहच्या जागी कोण संघात असणार याचे नाव जाहीर केलेले नाही, मात्र यामध्ये मोहम्मद शमी हाच ऑस्ट्रेलियाला जाणार आणि तोच बुमराहची रिप्लेसमेंट असणार अशा रिपोर्ट्स समोर येत आहेत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! विश्वचषकात ‘या’ दिग्गजाने भारतीय खेळाडूंना दिलेला सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला, वाचाच
पीएमडीटीए आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी स्पर्धेत अहान भट्टाचार्य, शर्विल गंगाखेडकर यांची आगेकूच
क्या बात है! क्रिकेटनंतर ‘या’ खेळात नशीब आजमावणार सचिन आणि धोनी? लेटेस्ट फोटो व्हायरल






