---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान: कोणत्या फलंदाजांनी ठोकलीत सर्वाधिक शतके? टॉप-5 मध्ये किती भारतीय?

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 5:14 PM
Pakistan-vs-Team-India
---Advertisement---

रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर असणार आहेत. मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पाकिस्तान संघासाठी ‘करा किंवा मरा’ अशी अवस्था आहे. जर पाकिस्तानने सामना हरला तर, चॅम्पियन्स ट्रॉफी मधला पाकिस्तानचा प्रवास समाप्त होईल. भारतीय संघ जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात बांग्लादेश संघाला 6 षटकांनी हरविले आहे. आता सर्व चाहत्यांच्या नजरा भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर टिकून आहेत. पण आत्तापर्यंतच्या भारत-पाकिस्तान वनडे फॉरमॅट मध्ये कोणत्या फलंदाजाने सर्वात जास्त शतक ठोकले आहेत? ते कोणते पाच फलंदाज आहेत. ते जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सलमान बट्ट यांचे नाव प्रथम क्रमांकावरती आहे. भारताविरुद्ध 21 वनडे सामन्यात सलमान बट्ट यांनी 5 शतके ठोकले आहेत. दुसरीकडे, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी 69 सामन्यातील 67 डावात 5 वेळा शतक करण्याचा आकडा पार केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा सर्वश्रेष्ठ खेळाडू शोएब मलिक ने भारताविरुद्ध 42 सामन्यात 4 शतके झळकावले आहेत. सईद अनवर आणि इंजमाम उल हक ने 4-4 शतके ठोकले आहे. तसेच, नासिर जमशेद, जहीर अब्बास, विराट कोहली, जावेद मियांदाद आणि युनिस खान यांच्या नावी 3-3 शतक आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान वनडे सामन्यात सर्वात जास्त शतक बनविणाऱ्या अन्य फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा, महेन्द्र सिंह धोनी, नवजोत सिंह सिद्धू, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, एजाज अहमद, सलीम मलिक, राहुल द्रविड़, मोहम्मद अजहरूद्दीन और शाहीद अफरीदी यांनी 2-2 शतके ठोकले आहेत. हैं.चैंपियंस ट्रॉफी मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर असतील. हा सामना दुबई येथे खेळला जाणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या : 

पाकिस्तानचा पराभव आणि दिग्गजाचा संताप! खेळाडूंना झणझणीत सुनावणी

भारतीय संघाचा दबदबा कायम! गुणतालिकेतील नवीन समीकरणे जाणून घ्या

शिखर धवनला मिळाली नवी जीवनसाथी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---