हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला अयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू दीपक हुड्डाला देखील सामील केले गेले आहे. भारताचे माजी दिग्गज खेळाडू संजय मांजरेकरांच्या मते आयर्लंडविरुद्ध हुड्डाला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली पाहिजे.
श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दीप हुड्डा (Deepak Hooda) भारतीय संघासाठी मध्यक्रमात चांगले प्रदर्शन करू शकतो, असे मत संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांचे आहे. श्रेयस आणि पंत नसल्यामुळे भारतीय संघाचा मध्यक्रम पोकळी तयार झाली आहे. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, पण चौथ्या क्रमांकाविषयी अद्याप कसलेही स्पष्टीकरण मिळाले नाहीये.
मांजरेकरांच्या मते भारताने पुढच्या मालिकेत मध्यक्रमात दीपक हुड्डासोबत मैदानात उतरले पाहिजे आणि त्याला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ साठी देखील संघात ठेवले पाहिजे. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे प्रदर्शन खूप चांगले होते आणि स्वतःच्या संघासाठी त्याने मध्यक्रमात खूप जबाबदारीने फलंदाजी केली होती. त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, मला आशा आहे की, दीपक हुड्डाला आयर्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच संधी मिळेल. कारण मी आयपीएल २०२२ मध्ये त्याला सर्वोत्तम प्रदर्शन करताना पाहिले आहे.
दरम्यान, दीपक हुड्डाने यावर्षी आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्ससाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते. याच कारणास्तव मांजरेकरांना त्याने चांगलेच प्रभावित केले आहे. आयर्लंडविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहली, जयप्रीत बुमराह अशा दिग्गज खेळाडूंचा भारतीय संघात समावेश नाहीये. सध्या वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे आयर्लंड दौऱ्यावर सर्व युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा निवडलेला भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चहल, ऋतुराजनंतर कर्णधार हार्दिक पंड्यासह उरलेला संघ आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना, पाहा फोटो
टीम इंडियाला दिलासा, विराट-रोहितचा घाम काढणारा इंग्लिश गोलंदाज वनडे, टी२० मालिकेला मुकणार?
बड्डे स्पेशल: फुटबॉलसाठीच जन्मलेला मेस्सी, वाचा त्याचे आश्चर्यकारक विक्रम