---Advertisement---

PBKS vs MI: पावसामुळे मॅच झाली नाही तर? जाणून घ्या काय सांगतात नियम!

On: रविवार, जून 1, 2025 8:05 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेचा दुसरा क्वालिफायर सामना आज म्हणजेच (1 जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मुंबई विरुद्ध पंजाब (Mi vs PBKS) खेळला जाणार आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने (shreyas iyer won the toss and choose Bowl first) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई इंडियन्सला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट दिसून येत आहे. सध्या अहमदाबादमध्ये हलकासा पाऊस पडत आहे. 31 मे पासूनच सरावादरम्यान पावसाने अडचण निर्माण केली आहे.

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत आज सामना होणे गरजेचे आहे. नियमांनुसार सामन्याच्या नियमित वेळेत पाऊस आला तर सामना अतिरिक्त वेळेमध्ये होईल. प्लेऑफ सामन्यांसाठी 120 मिनिटांचा अतिरिक्त टाईम ठेवण्यात आला आहे.

भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 56 मिनिटांपर्यंत सामन्याचा निर्णय घेण्यासाठी पाच-पाच षटकांचा सामना देखील खेळला जाऊ शकतो. जर पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आलीच, तर या परिस्थितीत पंजाब किंग्स अंतिम सामन्यात पोहोचेल. पंजाब संघाचे लीग स्टेजमध्ये जास्त पॉईंट्स होते, ज्याचा त्यांना फायदा होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---