---Advertisement---

CSK vs KKR: चेन्नईच्या संघात सामील असलेला अंशूल कंबोज आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

On: शुक्रवार, एप्रिल 11, 2025 8:26 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये 11 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना खेळला जात आहे. चेन्नईने कोलकाताविरुद्धच्या लढतीत अंशुल कंबोजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. चेन्नईने या हंगामात पाच सामन्यांमधील चार सामने गमावले आहेत . ऋतुराज गायकवाडला झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. महेंद्रसिंग धोनी पुन्हा कर्णधार होताच अंशुल कंबोजला संधी मिळाली आहे. कोण आहे हा अंशुल कंबोज? त्याला संधी मिळावी अशी चर्चा सातत्याने सोशल मीडियावर होत होती.

गेल्या वर्षी, 15 नोव्हेंबर 2024 रोजी हरियाणाकडून खेळणाऱ्या अंशुल कंबोजने एका डावात 10 पैकी 10 विकेट्स घेत नवा विक्रम रचला होता. तसेच रणजी करंडक स्पर्धेत एका डावात 10 विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला होता.

भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात 10 पैकी 10 विकेट्स पटकावण्याचा मान सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे आणि देबाशीष मोहंती यांनी पटकावला होता.
2022 मध्ये अंशुलने हरियाणासाठी खेळायला सुरुवात केली. 2023- 2024 हंगामात विजय हजारे स्पर्धेत अंशुल हरियाणासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉपच्या स्थानी होता.

मुंबई इंडियन्ससाठी अंशुलने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केलं होतं. ग्लेन मॅकग्रा हा अंशुलचा आदर्श आहे. 14 व्या वर्षी त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अंशुलने आगामी आयपीएल लिलावाच्या पार्श्वभूमीवर दमदार कामगिरीसह फ्रँचाइजींना त्याची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

6 मे 2024 रोजी अंशुलने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केलं होतं. अंशुल कंबोजने पदार्पणाच्या सामन्यात पहिली विकेट मिळवली. अंशुल कंबोज आज कोलकाता विरुद्ध प्रभावी कामगिरी करेल का? हे पाहणं रंजकतेचे असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---