---Advertisement---

कोण आहे भारताशी खास नाते असलेला किवी फिरकीपटू ‘एजाज पटेल’, कशी आहे त्याची कसोटी कारकीर्द?

On: रविवार, डिसेंबर 5, 2021 4:20 PM
Ajaz Patel
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या ३३ वर्षीय गोलंदाज एजाज पटेलने अप्रतिम गोलंदाजी करत इतिहासाला गवसणी घातली आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी (४ डिसेंबर) त्याने एकाच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. अनेकांना माहीत नसेल की, भारतीय संघातील फलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या या गोलंदाजाचे भारताची खास नाते आहे.

एजाज पटेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघातील एका पाठोपाठ एक १० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. असा कारनामा करणारा तो तिसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जिम लेकर आणि माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी केला होता. जिम लेकर यांनी १९५६ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध, तर अनिल कुंबळे यांनी १९९९ मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध एकाच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.

भारतासोबत आहे एजाज पटेलचे खास नाते
एजाज पटेल न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करत असला, तरी देखील तो मुळचा भारतीय आहे. त्याचा जन्म २१ ऑक्टोबर १९८८ रोजी भारताची आर्थिक राजधानी मुंबईत झाला होता. एजाज पटेल ८ वर्षांचा असताना तो आपल्या कुटुबांसह न्यूझीलंडला स्थायिक झाला होता. कुटुंबातील सदस्य न्यूझीलंडमध्ये असल्यामुळे त्याचे शिक्षण देखील न्यूझीलंडमध्ये झाले. तिथेच त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती.

तसेच त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत न्यूझीलंड संघासाठी ११ कसोटी सामने खेळले आहेत. या ११ सामन्यातील १९ डावात त्याने ३९ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ११९ धावा खर्च करत १० गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आतापर्यंत त्याला २ वेळेस ५ गडी, तर १ वेळेस १० गडी बाद करण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय फलंदाजांनी साधला अनोखा योगायोग; धावफलकावर पहिल्यांदाच दिसले ‘हे’ चित्र

लेकर, कुंबळेनंतर मुरलीधरन असता १० गडी बाद करणारा गोलंदाज; पण संघसहकारीच ठरला ‘व्हिलन’

एजाजच्या फिरकीने घेतली ‘विराटसेने’ची गिरकी, १४ विकेट्स घेत फिरकीपटूने केले ‘हे’ मोठे विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---