ऑस्ट्रेलिया टी20 संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने मंगळवारी (दि. 7 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. यापूर्वीच वनडे व कसोटी क्रिकेटमधून बाजूला झालेल्या फिंचने 36 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला संपूर्णपणे अलविदा केला. तो ऑस्ट्रेलियाला एकमेव टी20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार आहे. फिंच निवृत्त झाल्यानंतर आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा पुढील टी20 कर्णधार कोण याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2011मध्ये पदार्पण केले होते. टी20त त्याने 103 सामने खेळताना 34.29च्या सरासरीने 3120 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, टी20 तील त्याची 172 ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याच्या या निवृत्तीनंतर आता पुढील कर्णधार म्हणून अनेक नावे चर्चेत येत आहेत.
सध्या संघात उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत असलेला यष्टीरक्षक मॅथ्यू वेड हा ही भूमिका पार पाडू शकतो. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रदीर्घ काळाचा विचार केल्यास, तो या शर्यतीत मागे पडू शकतो. कारण, वेडचे सध्याचे वय 35 वर्षापेक्षा अधिक आहे. त्या व्यतिरिक्त अनुभवी अष्टपैलू व टी20 संघाचा नियमित सदस्य असलेला ग्लेन मॅक्सवेल हा देखील नवीन टी20 कर्णधारपदासाठी दावेदारी ठोकू शकतो. मॅक्सवेलने यापूर्वी फ्रेंचाईजी टी20 लीगमध्ये अनेकदा नेतृत्व केले आहे.
या दोघांव्यतिरिक्त अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस व ऍश्टन टर्नर यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो. स्टॉयनिस हा संघाचा प्रमुख सदस्य आहे. तर, टर्नर याच्या नेतृत्वात नुकतीच पर्थ स्कॉर्चर्सने बिग बॅश लीग पाचव्यांदा आपल्या नावे केलीये. अगदीच आश्चर्याचा धक्का दिल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याच्याकडे ही जबाबदारी देऊ शकते.
अनुभवी खेळाडूंचा विचार केल्यास स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हे देखील शर्यतीत सामील होऊ शकतात. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्याकडे नेतृत्व देण्यास सकारात्मक नसल्याचे वृत्त देखील समोर येतेय.
(Who Is Australia’s Next T20 Captain Maxwell Turner Wade Stoinis In Race)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ‘किंग कोहली’च्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड, सचिनच्या विक्रमालाही बसू शकतो धक्का
‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या 48 तासांपूर्वीच माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा