IPL 2024 Mallika Sagar: आयपीएल 2024 लिलावाला आता अवघे काही तास उरले आहेत. आयपीएल 2024 लिलावाचे आयोजन करण्यासाठी दुबई सज्ज झाली आहे. 19 डिसेंबर रोजी हा लिलाव दुबईच्या कोका-कोला भागात पार पडणार आहे. यावेळी तब्बल 333 खेळाडूंवर बोली लागणार आहे. जेव्हाही आयपीएल लिलावाचा विषय निघतो किंवा विचार येतो, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांपुढे ह्यूज एडमीड्स यांचा चेहरा येतो. ते अनेक वर्षांपासून आयपीएल लिलावात खेळाडूंवर बोली लावून घेण्याचे काम करत आहेत. मात्र, आता अशी बातमी आहे की, यावेळी आयपीएलमध्ये ह्यूज एडमीड्स नाही, तर मल्लिका सागर बोली लावून घेण्याचे काम करेल. चला तर, मल्लिका नेमकी कोण आहे, जाणून घेऊयात…
कोण आहे मल्लिका सागर? (Who is Mallika Sagar)
आयपीएल 2024 लिलावात ह्यूज एडमीड्स (Hugh Edmeades) खेळाडूंवर बोली लावून घेण्याचे काम करणार नाहीत. त्यांच्या ऐवजी, रिपोर्ट्सनुसार, मल्लिका सागर (Mallika Sagar) खेळाडूंचा लिलाव करताना दिसेल. मलिल्का सागरविषयी बोलायचं झालं, तर ती मुंबईची रहिवासी आहे. तिने यापूर्वीही ऑक्शनरची भूमिका बजावली आहे.
मल्लिकाने महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) म्हणजेच डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेच्या पहिल्या हंगामातही यशस्वीरीत्या सर्व खेळाडूंचा लिलाव करवून घेतला होता. महिला प्रीमिअर लीगमध्ये तिच्या वेगळ्या अंदाजातील लिलावाला अनेकांनी पसंती दर्शवली होती. विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला झालेला डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामाचा लिलावही तिनेच केला होता.
Mallika Sagar is likely to replace Hugh Edmeades as Auctioneer in the 2024 IPL auction. (Sportstar) pic.twitter.com/1ymRc5t0v0
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 5, 2023
Mallika Sagar will conduct the IPL 2024 auction in Dubai. [Cricbuzz] pic.twitter.com/rw1moczOQc
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2023
फक्त क्रिकेटच नाही, तर तिने प्रो कबड्डी लीग 2021चा (Pro Kabaddi League 2021) लिलावातही खेळाडूंवर बोली लावून घेण्याचे काम केले होते. अशात असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, मलिल्काला लिलावाचा दांडगा अनुभव आहे. मात्र, अद्याप आयपीएल किंवा बीसीसीआयकडून याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाहीये की, मल्लिका लिलावात बोली लावेल की नाही.
आयपीएलमधील आतापर्यंतचे ऑक्शनर्स
तब्बल 17व्या हंगामात पोहोचलेल्या आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली होती. आतापर्यंतच्या सर्व 16 हंगामात लिलाव झाला आहे. अशात यादरम्यान फक्त 2 ऑक्शनर्स होऊन गेले, ज्यांनी यादरम्यान बोली लावून घेण्याचे काम केले. त्यातील पहिले नाव होते रिचर्ड मॅडली आणि दुसरे ह्यूज एडमीड्स होय. हेडली यांनी 2008 ते 2018 यादरम्यान लिलावात खेळाडूंवर बोली लावून घेतली होती. त्यानंतर 2019 ते 2023पर्यंत ह्यूज एडमीड्स यांनी बोली लावून घेण्याचे काम केले. मात्र, आयपीएल 2022च्या मेगा लिलावादरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने चारू शर्मांनी पुढील जबाबदारी पार पाडली होती. अशात आता आयपीएल 2024मध्ये मल्लिका सागर लिलाव करवून घेताना दिसेल. अशाप्रकारे ती पहिल्यांदाच 17 वर्षांमध्ये पहिली महिला ऑक्शनर (First Female Auctioneer) बनेल. (who is first female ipl auctioneer mallika sagar know everything about her read)
हेही वाचा-
IPL 2024 Auction पूर्वी BCCIचा मोठा निर्णय, जे 16 हंगामात घडलं नाही, ते पहिल्यांदाच पाहायला मिळणार; वाचाच
लाजीरवाणा पराभव होताच आफ्रिकन कर्णधाराचे मोठे विधान; म्हणाला, ‘भारताच्या गोलंदाजांना…’






