स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि सोशल मीडिया सेंनेशन जास्मिन वालिया यांच्या डेटिंगच्या बातम्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. हे दोघं ग्रीसमध्ये सुट्टी घालवत असल्याचं बोललं जातंय.
पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या ग्रीसमध्ये जास्मिन वालियासोबत वेळ घालवत आहे. चाहत्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फोटो आणि व्हिडिओतील समान पार्श्वभूमीवरून याचा अंदाज लावला. याशिवाय जस्मिन वालियानं इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो हार्दिक पांड्यानं लाइक केले आहेत. तसेच जस्मिननं ग्रीसमधील पूलजवळील हार्दिक पांड्याचा व्हिडिओ लाइक केला आहे. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा जोरात सुरू आहेत.
जास्मिन वालियाचा जन्म इंग्लंडमधील एसेक्स येथे झाला. तिचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. ‘द ओन्ली वे इज एसेक्स’ (TOWIE) या ब्रिटीश रिॲलिटी टीव्ही मालिकेद्वारे जास्मिननं पहिल्यांदा लोकप्रियता मिळवली. तिनं 2010 मध्ये शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणून सुरुवात केली. परंतु लवकरच तिनं आपली छाप पाडली आणि 2012 मध्ये ती मुख्य कलाकार बनली.
येथून जास्मिन वालियानं मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिनं गाण्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथेही ती हिट झाली. 2014 मध्ये जस्मिननं स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं, जिथे ती दिग्गज गायकांच्या सहकार्यानं गाणी गायची. 2017 मध्ये जॅस्मिननं जॅक नाइटसोबत ‘बम डिग्गी’ हे गाणे रिलीज केलं, जे खूप यशस्वी ठरलं. या गाण्याची लोकप्रियता बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाली, जेव्हा जॅक नाइटनं ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटात हे गाणं गायलं होतं.
29 वर्षीय जास्मिन वालियानं 2022 मध्ये बिग बॉस 13 च्या अंतिम फेरीतील स्पर्धक असीम रियाझसोबत ‘नाइट्स अँड फाईट्स’ नावाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं. या दोघांच्या जोडीचं तेव्हा खूप कौतुक झालं होतं. या व्हिडिओला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली. हा व्हिडिओ न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर दिसला होता.
जस्मिन वालियाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे 6.4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय तिचे जवळपास 5.7 लाख यूट्यूब सबस्क्राइबर्स आहेत. जास्मिन वालियाला तिची बोल्ड फॅशन स्टाइल आणि बिकिनी फोटोंमुळे सोशल मीडिया स्टार म्हटलं जातं. ती सध्या सोशल मीडियावरील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहे.
View this post on Instagram
हेही वाचा –
मुंबई इंडियन्सला रोहितच्या अटी मान्य, कर्णधार बदलणार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आश्चर्यकारक निर्णय, कसोटी सामन्यात चक्क प्रेक्षकांवरच घातली बंदी
(15 ऑगस्ट) धोनीच्या स्टाईलमध्ये क्रिकेटला अलविदा करणार भारताचे हे 3 धुरंधर?