---Advertisement---

चौसष्ठ घरांचा राजा कोण ?

On: शुक्रवार, नोव्हेंबर 8, 2019 8:14 PM
---Advertisement---

-माधव बाळकृष्ण धनवे-पाटील .

पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेने दिनांक ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या दरम्यान पुण्यात सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

संघटनेचे अध्यक्ष जोसेफ डिसोजा हे ह्यावेळी बोलताना म्हणाले की “ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २३३ खेळाडूंनी भाग घेतला आहे.”

तसेच ह्यावेळी संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे म्हणाले की “ह्या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड होणार आहे. एकूण ५०००० रुपयांची बक्षिसे यावेळी देण्यात येतील.”

श्री कोंडे यांनी स्वतः अनेक वर्षे खेडो-पाडी जाऊन बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले आहे. ह्या स्पर्धेतसुद्धा खेडो-पाड्यातील अनेक मुला- मुलींनी भाग घेतला आहे.

बुद्धिबळ हा फक्त शहरी भागातील मुलांचा खेळ न राहता महाराष्ट्राच्या खेडो-पाड्यात हा खेळ पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही श्री कोंडे यांनी दिले आहे.

तालुक्यातून अगदी राष्ट्रीय स्तरावर खेळाडू जावे म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे देखील श्री कोंडे यांनी सांगितले.

ह्या स्पर्धेसाठी ऑल मराठी चेस अससोसिएशने सुद्धा सहयोग केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---