---Advertisement---

कोण आहे मोहम्मद अब्बास ? न्यूझीलंडसाठी पदार्पण सामन्यात पाकविरुद्ध झळकावले अर्धशतक

On: शनिवार, मार्च 29, 2025 5:04 PM
---Advertisement---

पहिल्या वनडे सामन्यात न्युझीलंड संघाने पाकिस्तानचा 73 धावांनी दारुण पराभव केला. तसेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1- 0 आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या या विजयात मोहम्मद अब्बासने मोठे योगदान दिले आहे. त्याने फक्त 26 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी पारी खेळली. अब्बासने त्याच्या पदार्पण सामन्यातच मोठे रेकॉर्ड त्याच्या नावावर केलं आहे. त्याने 24 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. तो वनडे मध्ये पदार्पण सामन्यात सर्वात वेगाने अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. याआधी हे रेकॉर्ड भारताच्या कृणाल पांड्याच्या नावावर आहे, ज्याने 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याच्या वनडे पदार्पण सामन्यात 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. चला तर जाणून घेऊया मोहम्मद अब्बास कोण आहे?

मोहम्मद अब्बास मूळचा पाकिस्तानी असून तो न्यूझीलंडचा क्रिकेटर आहे. त्याचा जन्म नोव्हेंबर 2003 मध्ये पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये झाला होता. क्रिकेटचा खेळ त्याच्या रक्तातच आहे. कारण त्याचे वडील अजहर अब्बास पाकिस्तानसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. अजहर अब्बास यांनी त्यांच्या करिअरमध्ये 45 सामने खेळलेले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 154 विकेट्स घेतले आहेत. अजहरनंतर न्युझीलंडमध्ये शिफ्ट झाले, जिथे त्यांनी वेलिंग्टन आणि ऑकलँडसाठी सुद्धा क्रिकेट खेळलं आहे. अजहर अब्बास आता वेलिंग्टन फायरबर्ड्स नावाच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.

मोहम्मद अब्बासने सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचे नाव बनवले आहे. त्याने न्युझीलंड मध्येच त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ऑकलँड आणि वेलिंग्टनचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. वेलिंग्टनसाठी खेळलेल्या 21 सामन्यांमध्ये त्याने 130 धावा केलेल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा सर्वाधिक स्कोर 130 आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये फक्त 21 वर्षांच्या वयात मोहम्मद अब्बासला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

पाकिस्तान संघाचा न्यूझीलंड दौरा 16 मार्च रोजी सुरू झाला होता. 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत न्युझीलंडने पाकिस्तानचा 4-1 पराभव केलेला आहे. आता न्यूझीलंडने वनडे मालिकेत सुद्धा चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या वनडे सामन्यात न्युझीलंडसाठी मार्क चैपमैनने 132 धावांची पारी खेळली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 344 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तान धावांचा पाठलाग करताना 271 धावांवर ऑल आउट झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---