---Advertisement---

रिषभ पंतचं हृदय चोरणारी सौंदर्यवती आहे तरी कोण? जिच्या एका फोटोचेही आहेत लाखो दिवाने

On: रविवार, एप्रिल 25, 2021 11:52 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करत आहे. मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांच्या डोक्याच्या ताण वाढवणाऱ्या या फलंदाजाला एका सौंदर्यवतीने क्लीन बोल्ड केले आहे. कोण आहे ती सौंदर्यवती चला जाणून घेऊया.

रिषभ पंत मैदानावर जितका आक्रमक आहे, तितकाच तो मैदानाबाहेर स्टायलिश देखील आहे. आपल्या लूक्सने लाखो मुलींना घायाळ करणाऱ्या रिषभ पंतला इशा नेगीने आपल्या प्रेमात पाडले आहे. सौंदर्याने परिपूर्ण असलेली इशा नेगी सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते.

जानेवारी १६, २०१९ मध्ये रिषभ पंतने इशासोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून लिहिले होते की, “मला फक्त तुला आनंदी करायचे आहे. कारण माझे आनंदी होण्यामागचे कारण तू आहेस.”

https://www.instagram.com/p/Bss2wWUBxpq/?igshid=184b1jxwbxx1s

https://www.instagram.com/p/B60_hRaHdry/?igshid=16nmoyt3mobj4

हाच फोटो इशाने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझा सोलमेट, माझा सर्वात खास मित्र, माझ्या आयुष्यातील प्रेम.”

https://www.instagram.com/p/Bss35DfFKpF/?igshid=1pv0swnjttfut

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याच फोटोनंतर रिषभ आणि इशा यांच्यातील नातेसंबंधांच्या बातम्यांना उधाण आले होते.

कोण आहे इशा नेगी?
इशा नेगी ही डेहराडूनची आहे. प्राथमिक शिक्षण डेहराडूनमधून घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी दिल्लीची वाट धरली होती. ती एका इंटेरियर डेकोर डिझायनिंग कंपनीची मालक असल्याचे म्हटले जाते. सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असणारी इशा आपल्या ग्लॅमरस फोटोजमुळे प्रसिद्ध आहे. तसेच रिषभ पंतसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे उघड झाल्यानंतर तिचे फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. पंतसोबत नाव जोडलं गेल्यानंतर सर्वत्रच तिची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तिने आपले पुढील शिक्षण अमेटी विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तिने इंग्लिश ऑनर्समधून बीएदेखील केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाला शोधावा लागणार नवा फिनिशर? दिनेश कार्तिकच्या खराब आकडेवारीने वाढली संघाची काळजी

‘बुमराह चांगला गोलंदाज आहे, पण सिराज बुमराहपेक्षाही उत्कृष्ट,’ भारतीय दिग्गजाचं मोठं भाष्य

केकेआरचा पराभवाचा ‘चौकार’, कर्णधार मॉर्गनने व्यक्त केली निराशा; सांगितली कुठे झाली चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---