सौरभ नेत्रावलकरने यंदाच्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी केला आहे त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हर मध्ये अमेरिकेले सामना जिंकवून दिला होता. सौरभने यूएसएला टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 फेरीत नेण्यात मोठी भूमिका बजावली आहे. अमेरिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर हा मूळचा भारतीय आहे. सौरभ नेत्रावळकर यांचा जन्म 16ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला. सौरभ नेत्रावळकरने 2010 रोजी अंडर-19 विश्वचषकादरम्यान केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि संदीप शर्मा यांसारख्या भारतीय खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले आहे.
सौरभ नेत्रावळकर हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून ओरॅकल कंपनीत कार्यरत आहे. सौरभ नेत्रावलकरची पत्नी देवी स्निग्धा मुप्पाला हिची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. जानेवारी 2020 मध्ये सौरभ नेत्रावलकर आणि देवी स्निग्धा मुप्पाला लग्न केले. देवी स्निग्धा मुप्पाला अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ओरॅकल कंपनीत काम करते.
देवी स्निग्धा मुप्पालाही ओरॅकल कंपनीत प्रिन्सिपल ॲप्लिकेशन इंजिनीअर म्हणून काम करते. सौरभ नेत्रावळकरची पत्नी देखील एक उत्तम कथ्थक डांसर आहे. देवी स्निग्धा मुप्पाला तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळते. सौरभ नेत्रावळकरच्या पत्नीला नृत्याची आवड आहे. देवी स्निग्धा मुप्पालानी कॉर्नेल विद्यापीठातून अभियांत्रिकी आणि संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मुप्पाला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ‘बॉलीक्स डान्स-फिटनेस’ नावाचा कार्यक्रम चालवतो.
सौरभ नेत्रावळकर आणि देवी स्निग्धा मुप्पाला हे आधुनिक सामर्थ्यवान जोडप्याचे उदाहरण आहे. जे आपल्या यशस्वी करिअर आणि वैयक्तिक आवड जोपासत आयुष्यात चांगले समतोल साधत आहेत. त्यांची कहाणी परस्पर आदर, सांस्कृतिक एकात्मता आणि त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालणारी आहे. ज्यामुळे अनेक युवांना प्रेरणा मिळत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
सुपर 8 मध्ये भारताला ‘या’ दोन संघांपासून सावध राहावं लागेल, माजी खेळाडूचा इशारा
रोहित शर्मासोबत सर्वकाही ठीक आहे का? शुबमन गिलची इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत
‘फादर्स डे’च्या निमित्त अनुष्काची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, रिंकूनेही दिल्या वडिलांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा!