आयपीएल २०२१ मध्ये सामन्यांचे विश्लेषण करण्यासाठी क्रिकेट लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित राहणारी सुंदर महिला अँकर कोण आहे? याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमांमध्ये अँकरींगचे काम करणाऱ्या या महिलेचे नाव तान्या पुरोहित आहे. तान्याच्या अंदाजामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे. आम्ही या लेखात तान्याविषयी चाहत्यांसाठी अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, जी अजूनपर्यंत फार जणांना माहीती नाही.
तान्या पुरोहित मुळ उत्तराखंडमधील श्रीनगर या शहरातील रहिवासी आहे. पण ती सध्या अँकरिंगचे काम करत असल्यामुळे तिला घरापासून लांब मायानगरी मुंबईमध्ये राहावे लागते. तिच्या शिक्षणाविषयी सांगायचे झाल्यास, तिने तिचे शिक्षण गढवाल यूनिवर्सिटीमधून पूर्ण केले आहे. तान्याने मास कम्यूनिकेशनमध्ये एमएचे शिक्षण घेतले आहे आणि सध्या अँकरींग करत आहे.
https://www.instagram.com/p/CP5D37XLyVw/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासोबत तान्या पुरोहितचे जुने संबंध आहेत, असे म्हणावे लागेल. कारण तान्याने अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘NH 10’ चित्रपटात सहकलाकाराच्या रूपात काम केले आहे. या चित्रपटात तान्याने मंजूचे पात्र साकारले होते. याव्यतिरिक्त तान्याने ‘टेररिस्ट अटॅक-बियाँड बांउड्री’ आणि ‘कमांडो’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केलेले आहे.
तान्याचे वडील एक शिक्षक होते. तिचे वडील डॉ. डीआर पुरोहित गढवाल विवि शिक्षण संध्येचे इंग्रजी विषयाचे निवृत्त प्राध्यापक आणि संस्कृति विशेषज्ञ आहेत. तान्याने तिच्या सध्याच्या पेशामधील व्यक्तीसोबतच संसार थाटला आहे. तिने सुप्रसिद्ध टीव्ही अँकर दीपक डोभाडा यांच्यासोबत लग्न केले आहे.
https://www.instagram.com/p/CUdI7TsMNMB/?utm_source=ig_web_button_share_sheet
तान्या सध्या ‘आयपीएल २०२१ दरम्यान क्रिकेट लाइव्ह’ या कार्यक्रमात समालोचन करत असून कार्यक्रमात तिच्या सहकाऱ्याची भूमिका भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण पार पाडत आहे. तान्या या कार्यक्रमात हिंदी भाषेत समालोचन करते आणि तिला क्रिकेटविषयीची चांगली माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक तोंडावर, पण त्याआधीचे सराव सामनेही महत्त्वाचे, वेळापत्रक झालंय घोषित; टाका नजर