आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरवात झाली आहे. तर आयपीएल 2024 आज स्पर्धेचा दुसरा दिवस असून खेळाबरोबरच मैदानाबाहेरही या स्पर्धेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच गुजरात टायटन्स संघ आपला पहिला सामना 24 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. तर त्या सामन्याच्या एक दिवस आधी, संघाचा धाकड खेळाडू डेव्हिड मिलरचा एका महिलेसोबत किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबरोबरच त्या व्हिडिओमध्ये ती महिला गिलला मिठी मारून त्याच्या गालावर किस करत आहे. त्यामुळे ती महिला कोण आहे, याबाबत सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.
अशातच या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला डेव्हिड मिलरची पत्नी कॅमिला हॅरिस असून नुकतेच 10 मार्च रोजी मिलर आणि कॅमिलाचे लग्न झाले होते. त्याचवेळी आता डेव्हिड मिलर आयपीएल खेळण्यासाठी भारतात पोहोचला आहे. मात्र, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल व्यतिरिक्त डेव्हिड मिलर आणि त्याची पत्नी दिसत आहेत. शुभमन गिलने डेव्हिड मिलरला अंगठी दिली, त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला अंगठी घातली आणि तिचे चुंबन घेतले. अशा प्रकारे डेव्हिड मिलरच्या लग्नाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
https://twitter.com/gujarat_titans/status/1771235767244734628
मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये राशिद खान, केन विल्यमसन, विजय शंकर आणि साई सुदर्शन सारखे खेळाडू दिसत आहेत. तर सोशल मीडिया यूजर्सला या व्हिडिओला खूप पसंती मिळाली आहे.
दरम्यान, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स 24 मार्चला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघ रविवारी आमनेसामने येणार आहेत. तर हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना रंगणार आहे. यापूर्वी, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 जिंकली होती. यानंतर ते आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचले, परंतु विजेतेपदाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, हार्दिक पांड्या या हंगामात गुजरात टायटन्सचा भाग असणार नाही. हार्दिक पंड्याच्या जागी शुभमन गिल गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना पहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-