आयपीएल 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचा संघ आमने-सामने आला होता. तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्जने 4 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 174 धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर कर्णधार पंतने या सामन्यात काही चुका केल्या ज्या दिल्लीला महागात पडल्या आहेत. तर या सामन्यात सॅम करनच्या 63 धावांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने हा सामना 4 गडी राखून जिंकला आहे.
याबरोबरच, दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजी करत 20 षटकात 9 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पंजाब किंग्सने शेवटच्या षटकात 6 गडी गमवून गाठलं आहे. यामध्ये सॅम करन आणि लियाम लिविंगस्टोनच्या भागीदारीने हा विजय सोपा झाला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. तर सॅम करनने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं आहे. यामध्ये सॅम करनने 47 चेंडूत 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे.
अशातच पंजाब किंग्सकडून कर्णधार शिखर धवनने 22, जॉनी बेअरस्टोने 9, प्रभसिमरन सिंग 26, सॅम करनने 63, जितेश शर्मा 9, शशांक सिंग 0 असे बाद झाले. तर लियाम लिविंगस्टोन नाबाद 38 आणि हरप्रीत ब्रार नाबाद 2 धावांवर नाबाद राहिले आहेत. तसेच सॅम करन या विजयाचा हिरो ठरला. त्याने 63 धावांची खेळी खेळली. दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने 19 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर विकेट घेतल्याने दिल्लीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
दरम्यान, या विजयासह पंजाब किंग्सच्या पदरात दोन गुण पडले आहेत. तसेच आतापर्यंत झालेल्या एकूण 33 सामन्यांची आकेडवारी पाहता पंजाब किंग्सने 17 तर दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर 16 विजय आहेत. त्यामुळे या विजयासाठी आकडेवारीत पंजाब किंग्सने आघाडी घेतली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- KKR समोर हैदराबादचं आव्हान! पॅट कमिंसने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
- कोल्हापूर संघाची सांगली संघावर मात, कोल्हापूर दुसऱ्या स्थानावर कायम