आयपीएल 2025 ट्रॉफी कोणता संघ जिंकेल? हा मोठा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. तत्पूर्वी भारताचे दिग्गज फलंदाज राहिलेले सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी या हंगामाच्या चॅम्पियन ठरण्यासाठी दावेदार असणाऱ्या संघाचे नाव घोषित केले आहे. गावस्कर यांनी सांगितले आहे की, हंगामाच्या शेवटी कोणता संघ ट्रॉफी जिंकेल गावस्कर यांनी त्या संघाचे नाव घेतले आहे, जो संघ मागच्या 17 हंगामांपासून ट्रॉफी जिंकण्यासाठी संघर्ष करत आहे. हा कोणताही दुसरा संघ नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आहे. ज्या संघाने आयपीएल 2025 स्पर्धेत शानदार प्रदर्शन केलेले आहे.
सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या हंगामात ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वात मजबूत दावेदारांपैकी एक आहे. आरसीबीचे या हंगामातील प्रदर्शन शानदार राहिलेलं आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली या संघाने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवले आहेत. ते सध्या 14 गुणांनी पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहेत.
इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, आरसीबीने या संपूर्ण हंगामात चांगली फलंदाजी आणि उत्तमरीत्या क्षेत्ररक्षण प्रदर्शन केले आहे. विराट कोहली, टीम डेविड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिकल आणि जोश हेजलवूड ह्या खेळाडूंनी संघाच्या यशस्वी प्रदर्शनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
गावस्कर यांनी हे देखील मान्य केले की, मागील सलग 6 सामने जिंकणारी मुंबई इंडियन्स आरसीबीच्या ताकदीचा मुकाबला करण्याच्या अगदी जवळ आहे. पण त्यांनी आरसीबीला ट्रॉफीच्या रेसमध्ये थोडे पुढे सांगितले. ते म्हणाले, आरसीबीची फलंदाजी आणि फिल्डिंग कमालीची राहिली आहे. मुंबई इंडियन्स ट्रॉफीच्या जवळ आहे, पण आरसीबी त्यांच्याही अगदी दोन पावले पुढे आहे. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, आरसीबी त्यांची ही लय अशीच पुढे टिकवून ठेवेल का?






