---Advertisement---

भारत-पाक सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोणाला बसणार मोठा फटका? वाचा सविस्तर

On: शनिवार, फेब्रुवारी 14, 2026 5:36 PM
---Advertisement---

भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक २०२६ सामना १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याने कोलंबोमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. ज्यामुळे आता भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होणार, जाणून घेऊया.

हवामान खात्याने कोलंबोसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. १४ फेब्रुवारी रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे आणि १५-१६ फेब्रुवारीपर्यंत ते वादळात रूपांतरित होऊ शकतं. ज्यामुळे श्रीलंकेत पूर येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या यायाला, मातारा, हंबनटोटा, टांगल्ला आणि गॅले सारख्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम किनाऱ्यावर थोडे उंचावर असलेल्या कोलंबोमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

२०२६ च्या टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर होणार आहे. बांगलादेश टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर निषेध म्हणून पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत (ICC) झालेल्या बैठकीनंतर, त्याने स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास सहमती दर्शवली. पण आता पावसामुळे हा सामना नाही झाला, तर कोणाचं नुकसान होणार?

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होणार हे जाणून घेऊया. सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने दोन्ही संघांसाठी फायदेशीर ठरेल, कारण सध्या त्यांचे प्रत्येकी ४ गुण आहेत. जर सामना रद्द झाला तर भारत आणि पाकिस्तानचे प्रत्येकी ५ गुण होतील आणि दोघेही सुपर-८ साठी पात्र ठरतील. तर अमेरिका आणि नेदरलँड्ससाठी हे नुकसान असेल.

विशेषतः अमेरिकेला सलग दुसऱ्यांदा सुपर ८ मध्ये पोहोचण्याची संधी गमवावी लागेल. नेदरलँड्स आणि अमेरिकेचे प्रत्येकी २ गुण आहेत, फक्त एक सामना शिल्लक आहे. जरी त्यांनी दोन्ही सामने जिंकले तरी त्यांचे प्रत्येकी ४ गुण असतील, परंतु ते पुरेसे ठरणार नाही.

दुसरीकडे, जर भारत-पाकिस्तान सामना झाला तर यापैकी एक संघ पुढील फेरीत पोहोचेल, परंतु दुसऱ्या संघाला नेदरलँड्स आणि यूएसएशी सामना करावा लागेल. पण, नेदरलँड्सचा मार्ग कठीण असेल, कारण त्यांचा अखेरचा सामना भारताविरुद्ध आहे. अमेरिकेचा शेवटचा सामना नामिबियाशी होईल, ज्यांनी अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. जर टीम इंडियाने १५ फेब्रुवारीला पाकिस्तानला हरवलं आणि नंतर नामिबियानेही पाकिस्तानला हरवून अपसेट निर्माण केला आणि यानंतर जर स्वतः अमेरिकेकडून पराभूत झाले तर अमेरिकन संघ पुढील फेरीत पोहोचेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---