दिल्ली कॅपिटल्सनं रिकी पाँटिंग यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवलं आहे. ते गेल्या 7 वर्षांपासून ही जबाबदारी सांभाळत होते. दिल्ली कॅपिटल्सनं अधिकृतपणे याची घोषणा केली असून आता रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुली यांच्यामुळे दिल्ली संघानं हा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
या संदर्भात सौरव गांगुली यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. गांगुली म्हणाले की, आम्हाला आयपीएल 2025 साठी नवीन योजना बनवावी लागेल. त्यामुळे रिकी पाँटिंग दिल्लीचे प्रशिक्षक नसून मी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावणार आहे. जर गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले, तर एखादा भारतीय प्रशिक्षक त्यांच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो.
सौरव गांगुली म्हणाले, “मला आयपीएल 2025 साठी एक योजना बनवायची आहे. मला दिल्ली कॅपिटल्ससाठी एकदा तरी आयपीएलचं विजेतेपद जिंकायचं आहे. पुढील वर्षी मेगा लिलाव आहे. त्यासाठी मी आतापासूनच नियोजन सुरू केलं आहे. रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणार नाही. पॉन्टिंग गेल्या 7 वर्षांत फ्रँचायझी पुढे नेण्यात सक्षम ठरला नाही. मला फ्रँचायझीशी बोलावं लागेल आणि त्यांना भारतीय प्रशिक्षकाकडे पाहण्यास सांगावं लागेल. मी संघाचा मुख्य प्रशिक्षक असेन. बघू मी कशी कामगिरी करतो.”
दिल्ली कॅपिटल्सनं याची अधिकृत घोषणा केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, आयपीएल 2024 नंतर रिकी पाँटिंगचा दिल्ली संघासोबतचा करार संपुष्टात आला होता. संघ व्यवस्थापनानं पाँटिंग यांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं त्यांच्या अधिकृत X हँडलवर एक भावनिक संदेश लिहून पाँटिंग यांना निरोप दिला. पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली दिल्ली संघ तीन वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला. संघ 2020 मध्ये उपविजेता राहिला होता. त्या हंगामात श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा…, आम्ही आमची टीम पाकिस्तानला पाठवणार नाही’, माजी क्रिकेटरनी पीसीबीली खडसावलं
असा खेळाडू पुन्हा होणे नाही; युवराज सिंगने क्रिकेट करिअरमध्ये जिंकल्या चक्क इतक्या ट्राॅफ्या! एकदा पाहाच
दादा यावेळी थेटच म्हणाले, “भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे….”