आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आता फक्त मोजूनच काही तास शिल्लक आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेचा थरार येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे. तर पहिल्याच सामन्यात 5 वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. तसेच हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. अशा परिस्थितीत, या स्टेडियमच्या खेळपट्टीचा अहवाल काय आहे, तसेच सामन्या दरम्यान हवामान कसे असेल याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत.
याबरोबरच आत्तापर्यंतच्या इतिहासात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरते. अशा स्थितीत फलंदाजांना जोरदार फटकेबाजी करणे सोपे नसणार आहे. मात्र, असे असताना देखील मागील काही सामन्यांमध्ये या मैदानावर फलंदाजी करणे सोपे गेले आहे. त्यामुळे गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली आहे. यामुळे चेपॉक स्टेडियमवर हाय स्कोरीग सामने होण्याची दाट शक्यता आहे.
अशातच चेपॉक स्टेडियमच्या या खेळपट्टीवर मागील आयपीएल हंगामात पहिल्या डावात सरासरी 170 धावा झाल्या होत्या. तसेच ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता, नाणेफेक जिंकणारे संघ या मैदानावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत असतात. अशा परिस्थितीत, सामन्या दरम्यान दिवसा उष्म असे वातावरण असणार आहे. तसेच शुक्रवारी चेन्नईमध्ये कमाल तापमान 34°C ते 36°C आणि किमान तापमान 25°C ते 27°C असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार या मैदानावर 2 सामने खेळवले जाणार आहेत. यामधील पहिला सामना 22 मार्चला आणि दुसरा सामना 26 मार्चला गुजरात टायटन्सशी होणार आहे.
दरम्यान, चेन्नई आणि बंगळुरूच्या संघात आतापर्यंत 31 सामने खेळले असून 20 सामन्यात सीएसकेने, तर 10 सामन्यात आरसीबीने बाजी मारली आहे. तसेच एक सामना अनिर्णित राहिला आहे. याबरोबरच, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नईची टीम यंदा देखील आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमला आतापर्यंत एकाही आयपीएलमध्ये विजेतेपद जिंकता आलेलं नाही. त्यामुळे यंदाच्या 17 व्या सीझनमध्ये विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानं बंगळुरु देखील स्पर्धेची सुरुवात विजयानं करण्याचा प्रयत्नात असणार आहे.
Get the whistles ready, the defending champions led by @msdhoni are all set for #TATAIPL 2024 😎@ChennaiIPL fans, get ready to paint the town Yellove! 💛 pic.twitter.com/ZOsWLm6o28
— IndianPremierLeague (@IPL) March 18, 2024
घ्या जाणून चेन्नईतील चेपॉक स्टेडियमची आयपीएल मधील आकडेवारी –
एकूण सामने :- 76
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने :- 46
नंतर फलंदाजी करताना जिंकले सामने :- 30
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL 2024: चेपॉकवर कोण कुणाला भारी? धोनीची चेन्नई की विराटची आरसीबी, काय सांगतात आकडे?
- दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूची अयोध्येतील राम मंदिरात पूजा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल