चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात लाहोर येथे खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ ग्रुप ब मध्ये सहभागी आहेत. या ग्रुपचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगानिस्तान सोबत खेळला गेला होता. त्यावेळी सामना दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला. स्टीव स्मिथ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघ मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाची धुरा जोस बटलर सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजी हल्ल्यातील एडम झांपा हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. दुखापतींमुळे संघातील अनेक अनुभवी खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ऑस्ट्रेलियाचे शॉन अॅबॉट, नॅथन एलिस आणि आरोन हार्डीचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला जाऊ शकतो. मॅथ्यू शॉर्ट आणि ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियासाठी सलामीला येऊ शकतात. मार्नस लॅबुशेन आणि जोश इंग्लिश हे देखील खेळण्याची शक्यता आहे.
इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली. पण यामध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. तथापि, बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने भारताला एक कठीण सामना दिला. आता संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल.
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर, बेन डकेट आणि फिलिप सॉल्ट यांना सलामीची संधी मिळू शकते. जो रूट हा संघाचा अनुभवी खेळाडू आहे. तेही मैदानात उतरू शकतात. हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंग्स्टन आणि ब्रेडेन कार्स हे देखील ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया – इंग्लंडची की प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया : मैथ्यू शॉर्ट, ट्रैविस हेड, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कैरी (यष्टिरक्षक), आरोन हार्डी, सीन एबॉट, नॅथन एलिस, एडम जाम्पा
इग्लंड : फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), जो रूट, हैरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंग्स्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड
महत्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाक संघर्ष: कोणत्या क्षणांनी जिंकली मने?
“भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये टीव्ही सुरक्षित असणार? माजी खेळाडूने दिले मोठे वक्तव्य”
RCB vs MI; हरमनप्रीत कौरचे शानदार अर्धशतक! मुंबईचा सलग दुसरा विजय






