---Advertisement---

इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानंतर अशी झाली आहेत सेमीफायनलची समीकरणे

---Advertisement---

2019 विश्वचषकात बुधवारी(3 जूलै) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात 41 वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 119 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच इंग्लंडने उपांत्य फेरीतील तिसरे स्थानही पक्के केले.

त्यामुळे आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तसेच चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचे नाव जवळ जवळ पक्के आहे, पण त्यांना उद्या(5जूलै) होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.

बांगलादेशला जर उद्या पाकिस्तानने 316 धावांनी पराभूत केले तरच न्यूझीलंड उपांत्य फेरीतून बाहेर जाईल. पण जर असे झाले नाही तर न्यूझीलंड नेटरनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

तसेच सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर त्यांचे साखळी फेरीतील अजून एक-एक सामने बाकी आहेत. भारतीय संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना श्रीलंकाविरुद्ध तर ऑस्ट्रेलिया शेवटचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शनिवारी खेळणार आहे.

त्यामुळे या सामन्यांनंतर गुणतालिकेत पहिले आणि दुसरे स्थान कोण मिळवणार हे पक्के होणार आहे. तसेच त्यानंतर उपांत्य फेरीत कोणाविरुद्ध कोणाचा सामना होणार हे देखील पक्के होईल.

2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामन्यांना 9 जूलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला उपांत्य सामना 9 जूलैला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरील आणि चौथ्या स्थानावरील संघात होईल. तसेच दुसरा उपांत्य सामना 11 जूलैला गुणतालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघात होईल.

उपांत्य फेरीसाठी या आहेत संभावना –

– जर शनिवारी दक्षिण आफ्रिकाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला आणि भारताने श्रीलंकेला पराभूत केले, तर भारत अव्वल स्थानावर येईल आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाशी(न्यूझीलंड किंवा पाकिस्तान) होईल. तर ऑस्ट्रेलियाचा सामना तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडशी होईल.

– ऑस्ट्रेलियाने जर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि भारताने श्रीलंकेला पराभूत केले, तर ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आणि भारत दुसऱ्या स्थानावर कायम राहिल. त्यानुसार उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाशी(न्यूझीलंड किंवा पाकिस्तान) होईल. तर भारताचा सामना तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडशी होईल.

– ऑस्ट्रेलियाने जर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि भारताला श्रीलंकेने पराभूत केले तरी ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आणि भारत दुसऱ्या स्थानावर कायम राहिल. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाशी(न्यूझीलंड किंवा पाकिस्तान) होईल. तर भारताचा सामना तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडशी होईल.

– जर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ पराभूत झाले  तरीही ऑस्ट्रेलियाच अव्वल क्रमांकावर आणि भारत दुसऱ्या स्थानावर कायम राहिल. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाशी(न्यूझीलंड किंवा पाकिस्तान) होईल. तर भारताचा सामना तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडशी होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पृथ्वी शॉ विंडीज दौऱ्यातून बाहेर; या तीन खेळाडूंना मिळाली संघात संधी

शाकिब अल हसनने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू

अष्टपैलू रविंद्र जडेजाने संजय मांजरेकरांना दिले असे चोख प्रतिउत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment