---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यात शिखरसह कोण करणार सलामीला फलंदाजी? ‘या’ तीन युवा फलंदाजाचे आहेत पर्याय

On: शनिवार, जून 26, 2021 11:36 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यंग ब्रिगेड श्रीलंका दौर्‍यासाठी जोरदार तयारी करत आहे. पुढील महिन्यात भारताच्या मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी अनेक अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थिती कर्णधार म्हणून शिखर धवन आणि उपकर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमार यांची निवड करण्यात आली आहे. या दौर्‍यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड असतील आणि ते संघाबरोबर श्रीलंकेला रवाना होतील.  ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत जाणारे भारतीय क्रिकेटपटू सध्या मुंबईत दोन आठवड्यांचा विलगीकरणामध्ये आहेत .

या दौर्‍यावरील सर्वात मोठा प्रश्न सलामीच्या जोडीचा आहे. भारताकडे कर्णधार म्हणून शिखर धवन आहे, जो सलामीला फलंदाजीला उरणार हे निश्चित आहे, पण त्याच्यासह सलामीला कोणाला उतरवायचे हा मोठा प्रश्न संघव्यवस्थापनाला सोडवावा लागेल. सध्या यासाठी ३ प्रमुख पर्याय भारतीय संघासमोर आहेत. या लेखातून शिखरबरोबर कोणते ३ खेळाडू सलामीला उतरु शकतात, याचा आढावा घेऊ.

१. पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉ धवनसह सलामीसाठी पहिला दावेदार असेल. धवनला दिल्ली कॅपिटल्समधील सलामीच्या जोडीदारासोबत जायला आवडेल. कारण आयपीएलमध्ये पृथ्वी शॉसोबत त्याचा मेळ चांगला आहे . द्रविड यांना देखील शॉच्या प्रतिभेबद्दल माहित आहे. त्यांच्या प्रशिक्षकपदाखालीच शॉने कर्णधार म्हणून २०१८ सालचा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर शॉकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील आहे. यामुळे शॉला पहिली पसंती मिळू शकते.

२. देवदत्त पडिक्कल
सलामीवीरांच्या निवडीचा विचार केला तर आयपीएलमधील आणखी एक उत्तम प्रतिभाशाली खेळाडूकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्षित करता येणार नाही. तो खेळाडू म्हणजे देवदत्त पडिक्कल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी देवदत्तने स्वत: ला मर्यादीत षटकांसाठी योग्य सलामीवीर असल्याचे सिद्ध केले आहे. त्याने आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे २१ सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ६६८ धावा केल्या आहेत, त्याची सर्वाधिक वयक्तिक खेळी ही १०१ धावांची आहे.

तसेच त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्येही अफलातून कामगिरी केली होती. या स्पर्धेत पृथ्वी शॉनंतरचा तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. शॉने ८२७ धावा केल्या होत्या. तर देवदत्तने ७३७ धावा केल्या होत्या. यावेळी या दोघांचीही सरासरी १४० पेक्षाही अधिक होती.

३. ऋतुराज गायकवाड
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळताना शानदार कामगिरी करत पुण्याच्या २२ वर्षीय ऋतुराज गायकवाडनेही सलामीवीर म्हणून दावेदारी ठोकली आहे. गायकवाडने आयपीएलच्या शेवटच्या दोन मोसमात १२४.६१ च्या स्ट्राईक रेटने ४०० धावा केल्या असून त्यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

उजव्या हाताच्या या फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३६ डावांमध्ये १३४९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याला श्रीलंकेत खेळण्याचा अनुभव देखील आहे. त्याने भारत अ संघाकडून श्रीलंकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्याने जवळपास १०० च्या सरासरीने धावा काढल्या होत्या. त्यामुळे तो सुद्धा सलामीवीर म्हणून चांगला पर्याय असेल.

महत्वाच्या बातम्या

अतरंगी बहिण-भाऊ! श्रेयस अय्यर लहान बहिणीबरोबर खेळतोय ‘हा’ अनोखा खेळ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ तिघांचा समावेश झाला तर ‘मिशन इंग्लंड’ होणार फत्ते

धोक्याची घंटा! टी२० विश्वचषकासाठी त्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणे कठीण, फिंचने दिला इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---