नवी दिल्ली। चीनी मोबाइल कंपनी विव्हो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील मोसमात म्हणजेच १३ व्या हंगामात आयपीएलला स्पॉन्सर करणार नाही. याबाबतीत अधिकृत घोषणेची प्रतिक्षा आहे. परंतु बीसीसीआयची चिंता वाढली आहे की, या वर्षी होणारी प्रतिष्ठित टी२० लीग आयपीएल स्पॉन्सर कोण करणार?
यावर्षी जून महिन्यात पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अनेक भारतीय लोकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत म्हटले होते. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने जेव्हा रविवारी (२ ऑगस्ट) बैठकीत विव्होलाच स्पॉन्सर म्हणून ठेवणार असल्याचे म्हटले असता, सोशल मीडियावर लोकांनी या निर्णयाला चांगलाच विरोध केला होता.
नवीन स्पाँसरबाबत सस्पेंस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विव्होने यावर्षी स्पॉन्सरशिप देण्यासाठी विश्रांती घेतली असल्याने ते आता २०२१, २०२२ आणि २०२३ ला स्पॉन्सरशिपचा करार पूर्ण करतील. खरंतर व्हिवोचा करार ३ वर्षांचा बाकी आहे. हा करार २०२२ ला संपणार होता. परंतू यावर्षी व्हिवो स्पॉन्सरशिप देणार नसल्याने करार हा २०२३ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे या वर्षासाठी नवीन स्पॉन्सरचे घोषणा लवकरच केली जाईल. परंतु सर्वांनाच प्रतिक्षा आहे, की इतक्या कमी वेळेत बोर्ड कोणत्या कंपनीला स्पॉन्सरशिपसाठी तयार करणार आहे.
२१९९ कोटी रुपयांमध्ये मिळविले होते अधिकार
विव्हो इंडियाने २०१७मध्ये आयपीएल टायटल प्रायोजक अधिकार २१९९ कोटी रुपयांमध्ये मिळविला होता. त्यामुळे विव्होला दरवर्षी आयपीएलला तब्बल ४४० कोटी रुपये द्यावे लागणार होते. या चीनी मोबाईल कंपनीने २०१६मध्ये ३९६ कोटी रुपयांचा करार असलेल्या सॉफ्ट ड्रिंकची दिग्गज कंपनी पेप्सिकोला हटवले होते.
४४० कोटींचा हिशोब आहे
विव्हो कंपनीचे यावर्षी स्पॉन्सर म्हणून हटल्यानंतरपासून या गोष्टीची प्रतिक्षा आहे की नेमकी कोणती कंपनी आयपीएलला स्पॉन्सर करेल. विव्होला दरवर्षी ४४० कोटी रुपयांची भली मोठी रक्कम द्यावी लागते. कोविड- १९ च्या या कठीण काळात कोणत्याही कंपनीसाठी हे कठीण असेल की इतकी मोठी रक्कम ते कशाप्रकारे देतील.
अधिकाऱ्यानेही म्हटले होते, नवीन स्पॉन्सर शोधणे कठीण
आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने रविवारी सर्व स्पॉन्सर्स कायम राखण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने ‘व्हर्च्युअल’ बैठकीत निर्णय घेतला की, आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान खेळण्यात येईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, “सध्याच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता अशा कमी वेळात नवीन स्पॉन्सर शोधणे बोर्डाला कठीण जाईल.”
पुढच्या महिन्यात सुरु होणार आयपीएलचा १३ वा हंगाम
आयपीएलचा १३वा हंगाम यूएईमध्ये पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे, तर आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. सुरुवातीला आयपीएलचे आयोजन मार्च महिन्यात २९ तारखेला होणार होती. परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-एक फलंदाज तर दुसरा अष्टपैलू, २ रिटायर क्रिकेटर रोहितला हवे आहेत मुंबई इंडियन्समध्ये
-कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर
-धोनीने सीएसकेला सांगितलं होतं; त्या खेळाडूला घेऊ नका, तो टीमची वाट लावेल
ट्रेंडिंग लेख –
-आजच्याच दिवशी ८८ वर्षांपूर्वी सीके नायडूंनी मारला होता तो ऐतिहासिक षटकार
-वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा वेसबर्ट ड्रेक्स
-५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक