---Advertisement---

‘बीसीसीआय’कडून अफगाणिस्तानला 3 पर्याय; बोर्डाची मात्र ग्रेटर नोएडालाच पसंती, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

On: बुधवार, सप्टेंबर 11, 2024 1:48 PM
---Advertisement---

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय पार्थिक स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना 6 सप्टेंबरपासून होणार होता. मात्र पावसानंतर स्टेडियमची दुरवस्था झाल्यामुळे पहिले दोन दिवस खेळच होऊ शकला नाही. तर तिसऱ्या दिवशीही पावसामुळे स्टेडियमची अवस्था बिकट झाली आहे. व्यवस्थापनाला दोन दिवस खेळपट्टी आणि आऊटफिल्डची दुरुस्ती करता आली नाही. त्यासाठी त्यांनी भाड्याने पंखे आणि कव्हरही मागितले. पण मैदान सुखवण्यात त्यांना यश मिळाले नाही.

अफगाणिस्तान संघासाठी ही घरची कसोटी आहे. कारण राजकीय समस्यांमुळे संघ मायदेशात आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकत नाही. पण अफगाणिस्तानला हा एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी बीसीसीआयने तीन स्थळांचा पर्याय देण्यात आला होता. आता ही एक मोठी गोष्टही समोर आली आहे. ज्यामध्ये कानपूर, बेंगळुरू आणि ग्रेटर नोएडा यांचा समावेश होता. मात्र असे असतानाही अफगाणिस्तानने ग्रेटर नोएडा स्टेडियमचीच निवड केली. विशेष म्हणजे या स्टेडियमवर बीसीसीआयने बंदी घातली आहे. आता प्रश्न पडतो की त्याने असे का केले? त्याचे उत्तर दिल्लीशी जवळीक आहे.

वास्तविक, दिल्ली नोएडाच्या अगदी जवळ आहे आणि तेथून अफगाण संघाला थेट काबूलला जाणारी विमानसेवा मिळते. यामुळेच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या एकमेव कसोटीसाठी ग्रेटर नोएडाची निवड केली. मात्र येथील खराब स्थिती पाहून आता या स्टेडियममध्ये कधीही सामना खेळणार नसल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

या स्टेडियमवर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2017 मध्ये येथे खेळला गेला होता. जेव्हा अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात पांढऱ्या चेंडूची मालिका खेळली गेली होती. त्याच वर्षाच्या शेवटी, सप्टेंबर 2017 मध्ये, कॉर्पोरेट सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंगची प्रकरणे उघडकीस आली. तेव्हा बीसीसीआयने स्टेडियमवर बंदी घातली होती.

दुसरीकडे, बीसीसीआयने 2016 मध्ये घोषणा केली होती की हे स्टेडियम अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे होम ग्राउंड असेल. ज्या वेळी आयसीसीने या स्टेडियमला ​​आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा दर्जा दिला होता. त्यावेळी हा प्रकार घडला होता. आयसीसीने दर्जा दिला असताना आणि बीसीसीआयने बंदी घातली असतानाही अफगाणिस्तानने हे स्टेडियम निवडले.

हेही वाचा-

99 टक्के मेहनत, 1 टक्के मज्जा, रोहित शर्माचा हा व्हिडिओ तुम्ही 1000 वेळा पाहाल
7 षटकार 52 धावा, 273 चा स्ट्राईक रेट, मुंबईच्या माजी क्रिकेटरचा विध्वंसक अंदाज!
ग्रेटर नोएडा स्टेडियमची व्यवस्था बेकार; बीसीसीआय नावालाच श्रीमंत बोर्ड? चाहत्यांचा आक्रोश!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---