Ravinda Jadeja, INDvsSA 1st Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मंगळवारपासून (दि. 26 डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात एकूण तीन खेळाडूंनी पदार्पण केले. भारतासाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. तसेच, दक्षिण आफ्रिका संघाकडून डेविड बेडिंगहॅम आणि वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर याने पदार्पण केले. मात्र, या सामन्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा खेळत नाहीये. यामागील कारण बीसीसीआय आणि रोहित शर्मा यांनी सांगितले.
का खेळत नाहीये जडेजा?
भारतीय संघाचे अनेक खेळाडू विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर थेट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानावर पुनरागमन केले. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, नाणेफेकीवेळी रोहितने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली, तेव्हा त्याने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे नाव घेतले नव्हते. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि शार्दुल ठाकूर यांना संघात जागा मिळाली, पण जडेजाचे नाव नव्हते. रोहितने यामागील कारण सांगताना म्हटले की, जडेजा दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीये.
बीसीसीआयने दिलेली माहिती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सामना सुरू होण्यापूर्वीच सांगितले होते की, “रवींद्र जडेजाने सामन्याच्या सकाळी पाठीच्या वरील बाजूला वेदना होत असल्याची तक्रार केली होती. तो पहिल्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध नव्हता.” दुसरीकडे, नाणेफेकीवेळी रोहितने पाठीत दुखत असल्यामुळे जडेजाच्या अनुपस्थितीची पुष्टी केली.
🚨 Team News 🚨
Prasidh Krishna makes his Test debut.
A look at #TeamIndia's Playing XI 🔽
Follow the Match ▶️ https://t.co/Zyd5kIcYso
𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: Mr Ravindra Jadeja complained of upper back spasms on the morning of the match. He was not available for selection for the… pic.twitter.com/r7Tch9hueo
— BCCI (@BCCI) December 26, 2023
रोहितचे विधान
रोहित म्हणाला की, “आम्ही चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत खेळत आहोत. जडेजाच्या स्थानी अश्विन खेळत आहे. जडेजाच्या पाठीला थोड्या वेदना होत्या, त्यामुळे अश्विन संघात आला आहे. प्रसिद्ध कृष्णा पदार्पण करत आहे. इतर वेगवान गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.”
विशेष म्हणजे, नाणेफेकीवेळी रोहितने हे मान्य केले की, तो निश्चित नव्हता की, या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करावी की, पहिली गोलंदाजी.
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा (why all rounder ravindra jadeja not play in india vs south africa 1st test bcci and rohit sharma explained 2023)
हेही वाचा-
रोहितची विकेट घ्यायचीय, मला बोलवा! ‘हिटमॅन’ बनला कागिसो रबाडाचा गिऱ्हाईक, वाचा किती वेळा झालाय Out
बर्गरचा कहर! 3 ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट्स, टीम इंडिया दबावात