क्रिकेट विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी रविवारी (१५ मे) सकाळी समोर आली होती. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याच्या कारला शनिवारी गंभीर अपघात झाला, ज्यात त्याचे निधन झाले. ४६ वर्षीय सायमंड्सने असा अचानक सर्वांचा कायमचा निरोप घेतल्याने क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातावेळी सायमंड्स एकटाच कारमध्ये होता, असे समजते.
सायमंड्सच्या (Andrew Symonds) निधनानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली. तसेच सोशल मीडियावर त्याचे रॉय हे टोपननाव ट्रेंड करत होते. त्याच्या अनेक ऑस्ट्रेलियन संघसहकाऱ्यांनीही त्याला श्रद्धांजली वाहताना रॉय (ROY nickname) हे नाव वापरले होते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की सायमंड्सचे रॉय हे टोपननाव पडले कसे?
सायमंड्सच्या रॉय या टोपणनावामागे एक मजेदार कारण आहे. त्याला हे नाव त्याचे बालपणीचे क्रीडा प्रशिक्षक यांनी दिले होते. त्याच्या रॉय या टोपणनावामागील कारण म्हणजे, तो माजी बास्केटबॉल खेळाडू लेरॉय लॉगिन्ससारखा (Leroy Loggins) दिसायचा. लॉगिन्स अमेरिकन-ऑस्ट्रेलियन बास्केटबॉलपटू होता, तसेच बराच प्रसिद्ध होता. लॉगिन्सने १९८१ पासून प्रसिद्ध नॅशनल बास्केटबॉल लीगमध्ये सहभाग घेतला होता. तो २००१ पर्यंत खेळत होता.
कार अपघातात सायमंड्सचे निधन
क्विन्सलँड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायमंड्स अपघातावेळी कारमध्ये (car accident) एकटा होता. त्याची कार रस्त्यावरून बाजूला जात पलटी झाली होती. त्यानंतर आप्तकालिन सेवेने त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. त्याच्या कारचा अपघात एलिस नदी पुलाजवळील हर्वे रेंज रोडजवळ झाला.
सायमंड्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
सायमंड्सने १९९८ साली ऑस्ट्रेलियाकडून वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचे २००४ मध्ये कसोटी आणि २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण झाले. त्याने २६ कसोटी सामने खेळले असून १४६२ धावा केल्या, तसेच २४ विकेट्स घेतल्या. त्याने कसोटीत २ शतके आणि १० अर्धशतके केली.
तसेच त्याने १९८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०८८ धावा केल्या असून १३३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याच्या नावावर ६ शतके आणि ३० अर्धशतके आहेत. त्याचबरोबर त्याने १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले, ज्यात त्याने २ अर्धशतकांसह ३३७ धावा केल्या आणि ८ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
गुजरातचे शानदार नेतृत्व करण्याचे श्रेय मुंबई इंडियन्सचे? पाहा काय म्हणतोय हार्दिक पंड्या
तब्बल ९ वेळा पुनरागमनाची संधी मिळालेला ‘विनोद कांबळी’; जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल
एकीकडे हसू, दुसरीकडे आसू! वानखेडेवर झालेला झाला चेन्नई-गुजरातसाठी विक्रमी, पण…