भारताचा संंघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून शुक्रवार रोजी (१४ जानेवारी) उभय संघांमधील ३ सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. या मालिकेतील केपटाऊन येथे झालेला तिसरा कसोटी सामना ७ विकेट्सने गमावत भारताने १-२ च्या फरकाने ही मालिकाही गमावली आहे. यानंतर शनिवारी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने तडकाफडकी कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडण्याचा (Virat Kohli Step Down As Test Captain) निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या या निर्णयाची घोषणा करताना भलीमोठी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी (MS Dhoni) याचे विशेष आभार मानले आहेत.
आपल्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर भलीमोठी पोस्ट लिहिताना त्याने शेवटी धोनीचे आभार मानले (Virat Kohli Thanked MS DHoni) आहेत.
एक कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या, तसेच माझ्यामध्ये भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा व्यक्ती पाहणाऱ्या, एमएस धोनीचे खूप खूप धन्यवाद, असे विराटने त्याच्या पोस्टच्या अंती लिहिले आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
भारताच्या या स्टार क्रिकेटपटूने धोनीचे आभार मानण्यामागचे प्रमुख कारण त्याने पोस्टमध्ये तर लिहिले आहेच. याखेरीज त्याने धोनीचे नाव घेण्यामागे अजून एक मोठे कारण आहे.
व्हिडिओ पाहा-
धोनीने २०१४-१५ ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ३० डिसेंबरला कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर जानेवारी २०१५ ला विराटला नियमित कसोटी कर्णधारपद मिळाले होते. त्याआधी त्याने त्याच दौऱ्यातील पहिल्या कसोटीत प्रभारी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्त्व केले होते. पहिल्या सामन्यात धोनी दुखापतीमुळे खेळला नव्हता.
तसेच धोनीने कसोटीतून निवृत्ती घेताना भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना असेही म्हटले होते की, माझ्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्यास एक शिलेदार तयार आहे, म्हणून मी कसोटीतून निवृत्त होत आहे. तो शिलेदार अजून कोण नसून खुद्द विराट होता, असा एका मुलाखतीत शास्त्रींनी खुलासा केला होता.
काहीदिवसांपूर्वीच मर्यादीत षटकांच्या कर्णधारपदावरूनही पायउतार
विराटने गेल्याचवर्षी सप्टेंबरमध्ये तो भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद टी२० विश्वचषकानंतर सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्याने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर निवड समीतीने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपदही काढून घेतले होते आणि भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली होती. आता विराटने कसोटी कर्णधारपदही सोडले असल्याने ही जबाबदारी बीसीसीआय कोणाच्या खांद्यावर टाकणार हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आदर्शवत’ अशीच राहिली विराटची नेतृत्व कारकीर्द; कोणालाही न जमलेले केलेत अनेक पराक्रम
विराटचा कसोटी संघनायक पदाचा राजीनामा; पण ‘हे’ आकडे पाहून म्हणाल, ‘भाऊ थोडी घाई केलीस’
बिग ब्रेकिंग! विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार, सोशल मीडियावर केली घोषणा
हेही पाहा-