गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये सोमवार 21 एप्रिल रोजी आयपीएल 2025 स्पर्धेतील 39 वा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरातने केकेआरचा 39 धावांनी पराभव केला. केकेआर संघाचा हा हंगामातील पाचवा पराभव आहे. या पराभवानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला केकेआर संघ पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर पोहोचला आहे. केकेआरने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुजरात विरुद्ध पराभवाचे कोणते मोठे कारण आहे, चला तर जाणून घेऊया.
कोलकाता नाईट रायडर्सच्या पाचव्या पराभवानंतर त्यांनी चाहत्यांचा उत्साह कमी केला आहे. कोलकाताच्या गुजरातविरुद्ध पराभवाचे मुख्य कारण म्हणजे, पुन्हा- पुन्हा सलामीवीर फलंदाज बदलणे आहे. केकेआर कडून ओपनिंगसाठी सुनील नरेन सोबत कधी रहमानुल्लाह गुरबाज़ तर कधी मोईन अली खेळताना दिसतो. पुन्हा पुन्हा ओपनर्स फलंदाज बदलणे यामुळे संघाचे नियंत्रण बिघडत आहे.
केकेआरने या हंगामात त्यांच्या फलंदाजीच्या मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा काही बदल केले आहेत. कोलकातासाठी चौथ्या स्थानावर व्यंकटेश अय्यर कधी फलंदाजी करतो, तर कधी अंगकुश रघुवंशीला संधी देण्यात येते.
केकेआरने हंगामात खेळाडूंच्या फलंदाजीची जागा सातत्याने बदलली आहे. सोमवार 21 एप्रिल रोजी गुजरात विरुद्ध सामन्यात अंगक्रूश रघुवंशी चौथ्या स्थानावर खेळण्यास येण्याऐवजी नवव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी आला. या सामन्यात रघुवंशीने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या, तसेच चौथ्या नंबरवर आलेला व्यंकटेश 19 फक्त 14 धावा करू शकला.
केकेआरच्या या बदलांमुळे धावसंख्येवर खूप फरक पडत आहे. सारखा-सारखा खेळाडूंचा फलंदाजी क्रम बदलल्याने संघावर वाईट परिणाम होत आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे, ज्यामुळे ते धावा करू शकत नाही आहेत.






