दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव आयपीएल २०२२ मध्ये धडाकेबाज गोलंदाजी प्रदर्शन करत आहे. गुरुवारी (२९ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात कोलकाताच्या ४ विकेट्स घेतल्या. ३ षटके गोलंदाजी करताना १४ धावा देत त्याने कोलकाताच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडले.
मात्र दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) त्याला त्याच्या कोट्यातील चौथे षटक टाकायची संधी मिळाली (Kuldeep Yadav Last Over) नाही. यामुळे दिल्लीचा कर्णधार पंत मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. आता स्वत: पंतने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर पंतने कुलदीपला (Kuldeep Yadav)चौथे षटक न देण्याबाबत स्पष्टीकरण (Rishabh Pant On Kuldeep Yadav Last Over) देताना म्हटले की, “आम्ही विचार केला होता की, कुलदीपकडून त्याचे शेवटचे षटक करून घ्यायचे. परंतु नंतर चेंडू खूप ओला झाला होता. तसेच माझी इच्छा होती की, विरोधी संघातील फलंदाजांसाठी चेंडूची गती बदलली जावी. त्यामुळे मी वेगवान गोलंदाजांना आक्रमणासाठी घेऊन आलो, परंतु माझी ही रणनिती कामी आली नाही.”