मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या अचानक निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. आता भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाने धोनीबद्दल आपले मत मांडली आहे.
ती म्हणाली की, जर धोनीला हवा असता तर फेअरवेल हा सामना खेळू शकला असता आणि नंतर क्रिकेटला निरोप देण्याविषयी बोलू शकला असता, परंतु तो इतरांपेक्षा वेगळा आहे. तो त्याच्यातील सद्गुणांसाठी ओळखला जातो.
स्पोर्ट्सकिडाशी बोलताना सानिया मिर्झा म्हणाली की, “मला वाटते की धोनीच्या याच गोष्टी त्याला कॅप्टनकूल बनवतात, धोनी एक अशी व्यक्ती आहे ज्याने स्वत: साठीच नाही तर देशासाठी बरेच काही साध्य केले आहे आणि देशाचा गौरव वाढविला आहे.” धोनीबद्दल बोलताना, 33 वर्षीय सानिया मिर्झाने त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल देखील चर्चा केली.
ती म्हणाली की, “धोनीमध्ये असे बरेच गुण आहेत जे माझे पती शोएब मलिकसारखे आहेत. त्यांनी मला माझ्या नवऱ्याची आठवण करून दिली. दोघांमध्ये बरीच समानता आहेत, दोघेही एकसारखे आहेत पण मजेदार आहेत. क्रिकेटच्या मैदानावर दोघेही शांत असतात. खरे सांगायचे तर धोनी अनेक बाबतीत शोएब मलिकसारखा आहे,” असे सानिया मिर्झाने सांगितले.