कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षितता म्हणून बीसीसीआयने आयपीएल स्थगित केली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील वनडे मालिकाही बीसीसीआयने रद्द केली आहे. परंतु या दरम्यान बीसीसीआयने आणखी एक मोठा धक्कादायक निर्णय घेतला.
तो असा की, भारताचा माजी कसोटी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांना (Sanjay Manjrekar) समालोचकांच्या पॅनेलमधून काढून टाकण्यात आले आहे.
भारतातील एक चांगले समालोचन करणारे मांजरेकर त्यांच्या मागील काही वक्तव्यांमुळे बरेच वाद झाले. पण तरीही त्यांना समालोचक पॅनेलमधून काढण्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे की, मांजरेकरांना समालोचन पॅनेलमधून का काढण्यात आले?
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरेकरांच्या कामगिरीवर बीसीसीआय खूश नव्हते.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मांजरेकर या मालिकेसाठी पॅनेलचा भाग नव्हते. परंतु याचा अर्थ असा नाही की, पुढील मालिकेसाठी ते पॅनेलमध्ये नसतील. खरंतर समालोचक दोन प्रकारचे असतात. यापैकी एक बीसीसीआयशी जोडलेला असतो. ज्याला ‘समालोचकाचा संघ’ म्हटले जाते. दुसऱ्या प्रकारचे समालोचक म्हणजे यजमान प्रसारकांचे (स्टार) समालोचक असतात.
मुंबईचे माजी कर्णधार मांजरेकर आपल्या वक्तव्यामुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात असतात. त्यांनी 2019च्या आयसीसी विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाबद्दल विवादास्पद वक्तव्य केले होते. त्यावेळी मांजरेकरांना टीकेला सामोरे जावे लागले होते.
एवढंच नाही तर यानंतर मांजरेकरांनी हे पुढे सुरुच ठेवले. कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये खेळण्यात आलेल्या ऐतिहासिक गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेवर क्रिकेट न खेळल्यामुळे क्रिकेट न समजूतीबद्दल टीका केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-विश्वचषक उपविजेत्या केवळ या महिला क्रिकेटरचा झाला यथोचित सन्मान
– टीम इंडियाचा हा शिलेदार करणार टी20मध्ये दणदणीत द्विशतक
–भारताचे हे इनडोअर क्रिकेट ग्राउंड नाही फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी, पहा फोटो





